‘आशिकी’ आणि ‘जो जीता वही सिकंदर’ या सिनेमांसोबतच आणखीही काही हीट सिनेमांत चमकलेला अभिनेता दीपक तिजोरी लवकरच छोट्या पडद्यावर पुन्हा परतणार आहे. मराठीतल्या दिग्गज अभिनेत्री रेणुका शहाणे आणि रोहित सराफ यांच्यासोबत तो एका मालिकेत दिसणार आहे. अॅण्ड प्राईव्ह एचडी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर त्याची ही नवी मालिका लवकरच दाखवली जाणार आहे.
याबाबतची घोषणा त्याने या सिनेमाचे पहिले टीजर इन्स्टाग्रामवरील आपल्या पेजवर टाकत केली आहे. आतापर्यंत त्याने एकतर हीरोचा टवाळका मित्र किंवा अमीर बाप का बिगडा हुआ बेटा अशाच भूमिका केल्या आहेत. मात्र आपली ही भूमिका अतिशय वेगळी असून यापूर्वी अशी व्यक्तिरेखा आपण कधीच साकारली नव्हती असे तो सांगतो.