दिग्दर्शक शिबू थमिन्स ‘मुंबईकर’ या आपल्या सिनेमाच्या शूटिंगसाठी आणखी काही दिवस घ्यायला सांगत असूनही दिग्दर्शक संतोष सिवन आपल्या सवयीनुसार झटपट काम करत आहेत. त्यांच्या योजनेनुसार या सिनेमाचे चित्रीकरण 27 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण होणार असून तो 27 मार्चला प्रदर्शित करण्यात येणार आहे. एस. एस. राजामौली आणि करण जोहर यांच्या उपस्थितीत या सिनेमाचा मुहूर्ताचा क्लॅप पडल्यापासून लगेचच या सिनेमाचे शूटिंग धडाक्यात सुरू झाले आहे.
‘मुंबईकर’ हा दिग्दर्शक संतोष सिवन यांचा एक तुफान अॅक्शनपॅक्ड सिनेमा असून यात विक्रांत मेसी, विजय सेथुपथी, तान्या माणिकताला, संजय मिश्रा, रणवीर शौरी आणि सचिन खेडेकर प्रमुख भूमिकेत आहेत. याचे चित्रीकरण मुंबईत सध्या स्टार्ट टू फिनीश सुरू आहे. या चित्रपटातून हृधू हारून हा नवोदीत तरुण अभिनेता बॉलीवूडला मिळणार आहे.