• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

इशांत शर्माचे ‘त्रिशतक’, झहीर, कपिल देव यांच्या पंक्तीत मिळवले स्थान

टीम मार्मिक by टीम मार्मिक
February 8, 2021
in घडामोडी
0
इशांत शर्माचे ‘त्रिशतक’, झहीर, कपिल देव यांच्या पंक्तीत मिळवले स्थान

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा याने चेन्नईतील एम. चिन्नास्वामी मैदानात इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत नवा माइलस्टोन गाठला. कसोटी क्रिकेटमध्ये बळींचे ‘त्रिशतक’ झळकावण्याचा पराक्रम इशांतने केला आहे. टीम इंडियाकडून कसोटी क्रिकेटमध्ये 300 बळी घेणारा तो फक्त तिसरा वेगवान गोलंदाज आहे.

इंग्लंडविरुद्ध चेन्नई कसोटीत चौथ्या दिवशी इशांत शर्मा याने डॅनियल लॉरेंस याला पायचित केले. कसोटी क्रिकेटमधील हा त्याचा 300 वा बळी होता. इशांत शर्मा याच्या आधी फक्त डावखुरा गोलंदाज झहीर खान आणि दिग्गज अष्टपैलू खेळाडू कपिल देव यांनीच अशी कामगिरी केली आहे. आता इशांतलाही त्यांच्या पंक्तीत स्थान मिळाले आहे.

इशांत शर्मा याने 98 व्या कसोटीत 300 बळींचा टप्पा गाठला. कपिल यांच्या नावावर 131 कसोटीत 434 तर झहीर खान याच्या नावावर 92 कसोटीत 311 बळींची नोंद आहे. इशांतकडे इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत 100 वा कसोटी सामना खेळण्याचीही संधी आहे, तसेच पुढील तीन कसोटीत 12 बळी घेत झहीर खान याचा विक्रम मोडण्याचीही सूवर्णसंधी आहे.

सर्वश्रेष्ठ गोलंदाजी

इशांत शर्मा हा मोठ मोठे स्पेल टाकण्यात माहीर आहे. 2007 ला बांगलादेशविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या इशांतने इंग्लंडविरुद्ध लॉर्डसच्या मैदानावर 74 धावा देत 7 बळी घेतले होते. ही त्याची कसोटी कारकीर्दीतील सर्वश्रेष्ठ गोलंदाजी आहे.

टीम इंडियाकडून सर्वाधिक बळी घेणारे गोलंदाज

अनिल कुंबळे – 619 बळी
कपिल देव – 434 बळी
आर. अश्विन – 382 बळी
झहीर खान – 311 बळी

सौजन्य : दैनिक सामना 

Previous Post

पाकिस्तानचे आर्थिक कंबरडे मोडले; प्रत्येक नागरिकावर 1 लाख 75 हजारांचे कर्ज

Next Post

कोरेगावात निवासी शाळेतील 31 विद्यार्थी कोरोनाग्रस्त

Next Post
राज्यातील 4 हजार शिक्षक – शिक्षकेतर कर्मचाऱ्य़ांना कोरोना

कोरेगावात निवासी शाळेतील 31 विद्यार्थी कोरोनाग्रस्त

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.