भीमा कोरेगाव तसेच एल्गार परिषद प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या गौतम नवलखा यांचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळून लावला आहे.
भीमा कोरेगाव हिंसाचारातील नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरुन गौतम नवलखा, आनंद तेलतुंबडे यांच्यासह इतर काही जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
या जामीन अर्जावर आज न्यायमूर्ती एस एस शिंदे आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी खंडपीठाने जामीन अर्ज फेटाळून लावला. उच्च न्यायालयाकडूनही गौतम नवलखा यांना दिलासा मिळालेला नाही.