केंद्र सरकारने पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटला देशभरात 240 लाख डोस न्यूमोनिया प्रतिबंधक लस पुरवण्याची ऑर्डर दिली आहे. न्यूमोकोकल कॉन्जगेट व्हॅक्सिनचा(पीसीवी) उपयोग शिशु, बालके आणि वयस्कर नागरिकांत स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनिया विषाणूमुळे होणारी विविध आजारांपासून सुरक्षा मिळावी म्हणून केला जातो.
या जीवघेण्या आजारांत मेनिन्जायटिस, बेक्टिरेमिक न्यूमोनिया आणि सेप्टीसीमिया या रोगांचा समावेश आहे. सिरमच्या लसीचा एक डोस जीएसटीसह रुग्णाला 118.53 रुपये या किमतीत उपलब्ध होणार आहे. न्यूमोनियाच्या विषाणूला पराभूत करण्यासाठीच्या या लसीच्या खरेदीसाठी केंद्र सरकारने अर्थसंकल्पात 452 .47 कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले.