दिवसेंदिवस पेट्रोल- डिझेल आणि गॅसदरवाढीने महागाईच्या भडक्यात सर्वसामान्य जनता अक्षरशः होरपळून निघत असतानाही,हि दरवाढढ कमी करण्या -ऐवजी उलट वाढतच आहे.त्यामुळे अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून सर्वसामान्यांची फसवणूक करणाऱ्या मोदी सरकार विरोधात आज शिवसेनेच्या वतीने प्रतिकात्मक सायकल मोर्चा काढुन, बोंब मारो आंदोलन करत,तीव्र निषेध करण्यात आला.
शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी राजीव गांधी पुतळा येथुन मध्यवर्ती बसस्थानक परिसरात हा सायकल मोर्चा काढला. दाभोळकर चौकात मोदी सरकारचा कडाडुन विरोध करत,बोंब मारुन निषेध करण्यात आला. यावेळी पेट्रोल डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या किंमती त्वरित कमी करा अशा मागण्यांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे महाराष्ट्रा -सह देशभरात पेट्रोल-डिझेल,गॅस दरवाढ भयानक प्रमाणात वाढवल्यामुळे सर्वसामान्य नागरीकांचे जगणे मुश्कील झाले आहे.सत्तेवर येण्यापूर्वी अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून निवडून आल्यानंतर आज पर्यंत फक्त बुरे दिनच पाहायला सर्वानाच मिळाले आहेत. हे मोदी सरकार ( केंद्र ) सर्वसामान्य नागरीकांचे नसुन फक्त ठरावीक उद्योगपतींचे असल्याचे अनेक वेळा सिध्द झाल्याचे जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी सांगितले. यावेळी माजी आमदार सुरेश साळोखे, महिला आघाडीच्या शुभांगी पवार,युवासेनेचे हर्षल सुर्वे, करवीर तालुका प्रमुख राजु यादव,अवधुत साळोखे,दिनेश परमार,कृष्णात पोवार आदी शिवसैनिक उपस्थित होते.