• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

ग्रेप हार्वेस्टिंगपासून काजवे महोत्सव, फेब्रुवारी-मार्चमध्ये पर्यटनाला बहर

टीम मार्मिक by टीम मार्मिक
February 5, 2021
in घडामोडी
0
ग्रेप हार्वेस्टिंगपासून काजवे महोत्सव, फेब्रुवारी-मार्चमध्ये पर्यटनाला बहर

राज्यातील फारशी लोकप्रिय नसलेली स्थळे महाराष्ट्राच्या पर्यटन नकाशावर आणण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम पर्यटन विभागाने आखला आहे. त्याचाच एक भाग म्हणून नाशिकमध्ये ग्रेप हार्वेस्टिंग महोत्सव, भंडारदरा भागात काजवे महोत्सव, कोल्हापुरात पन्हाळा महोत्सव, सिंधदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ला (सागरेश्वर) महोत्सव होणार आहे.

राज्याच्या पर्यटन संचालनालयामार्फत राज्यातील कोकण, पुणे, नाशिक, संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर या सहा विभागांमध्ये विविध वीस पर्यटन महोत्सवांचे आयोजन करण्यात येणार आहे. राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांत हे आयोजन करण्यात येईल.

धुळ्यात लळिंग महोत्सव

या महोत्सवांमध्ये नाशिक जिह्यात ग्रेप हार्वेस्टिंग महोत्सव, नांदूरमधमेश्वर महोत्सव, नगर जिह्यातील भंडारदरा भागात काजवे महोत्सव तसेच धुळे जिह्यात लळिंग किल्ला महोत्सवाचा समावेश आहे.

वाई महोत्सव

पुणे जिह्यामध्ये जुन्नर द्राक्ष महोत्सव, सातारा जिह्यात वाई महोत्सव तसेच कोल्हापूर जिह्यात पन्हाळा महोत्सवाचा अनुभव घेता येईल.

कोकणात वेंगुर्ला महोत्सव

कोकणामध्ये सिंधदुर्ग जिह्यात वेंगुर्ला (सागरेश्वर) महोत्सव, रायगड जिह्यात श्रीवर्धन महोत्सव, रत्नागिरी जिह्यात कातळशिल्प महोत्सव तसेच वेळास/आंजर्ले महोत्सवाचा आनंद घेण्याची संधी पर्यटकांना मिळणार आहे.

तेर आणि राजा महोत्सव

संभाजीनगर विभागात काही लोकप्रिय महोत्सवांचे आयोजन करण्याचे निश्चित केले असून त्यामध्ये धाराशीव जिह्यात तेर महोत्सव, बीड जिह्यामधील कपिलधारा महोत्सव तसेच नांदेड जिह्यातील होट्टल महोत्सवाचा समावेश आहे. अमरावती विभागात बुलढाणा जिह्यात सिंदखेडराजा महोत्सव, अकोला जिह्यात नरनाळा किल्ला महोत्सव तसेच यवतमाळ जिह्यात टिपेश्वर अभयारण्य महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.

भटकंतीची संधी

यासंदर्भात माहिती देताना पर्यटन संचालक डॉ. धनंजय सावळकर म्हणाले की, कोरोनाचा संकटकाळ अतिशय कठीण होता. आता हळूहळू स्थिती पूर्वपदावर येत असताना पर्यटकांचे स्वागत करण्याकरिता महाराष्ट्राने तयारी केली आहे. राज्याची भटकंती करण्याची संधी या महोत्सवातून उपलब्ध करून देण्यात आली असून महाराष्ट्र समजून घेता यावा या उद्देशाने पर्यटकांना महोत्सवात सामील होण्याचे आवाहन करत आहोत. राज्याला मोठा सांस्कृतिक वारसा आहे. हा वारसा आणि राज्याचे सौंदर्य या महोत्सवांतून पाहण्याची संधी यानिमित्ताने पर्यटकांना मिळणार आहे.

सौजन्य : दैनिक सामना 

Previous Post

आलिया, रणवीर पुन्हा दिसणार एकत्र

Next Post

कोल्हापूर – इंधन दरवाढीविरोधात शिवसेनेचा सायकल मोर्चा

Next Post
कोल्हापूर – इंधन दरवाढीविरोधात शिवसेनेचा सायकल मोर्चा

कोल्हापूर – इंधन दरवाढीविरोधात शिवसेनेचा सायकल मोर्चा

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.