मराठी साहित्यामध्ये आपल्या लेखनाने महत्त्वपूर्ण योगदान देणारे ज्येष्ठ साहित्यिक शंकर सारडा यांचे वृद्धापकाळामुळे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
मराठी साहित्यामध्ये आपल्या लेखनाने महत्त्वपूर्ण योगदान देणारे ज्येष्ठ साहित्यिक शंकर सारडा यांचे वृद्धापकाळामुळे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
महाबळेश्वर येथे 4 सप्टेंबर 1937 रोजी शंकर सारडा यांचा जन्म झाला. त्यांनी 1950 पासून सातत्याने बालसाहित्य लेखन केले. सारडा यांनी पत्रकार, समीक्षक आणि बालसाहित्यकार म्हणून महत्त्वपूर्ण योगदान दिले. लहानपणीच त्यांचे लेखन आनंद, बालमित्र, साधना यांसारख्या अंकांमधून प्रसिद्ध झाले होते. पत्रकार म्हणूनही त्यांनी राज्यातील अनेक दैनिकांमध्ये विविध पदांवर काम केले. दैनिक ‘सामना’ मध्येही त्यांनी पुस्तक परीक्षण केले. सारडा यांनी ‘चक्र,’ ‘माहीमची खाडी,’ ‘वासुनाका’ अशा पुस्तकांवर लिहिलेला विस्तृत लेख आणि इतरही महत्त्वाच्या कविता-कादंबऱ्यांची केलेली परीक्षणं गाजली.
महाबळेश्वर येथील विभागीय साहित्य संमेलन, महाराष्ट्र मुद्रण परिषदेचे अधिवेशन, सातारा येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, पहिले अभिजात साहित्य संमेलन, अखिल भारतीय बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद सारडा यांनी भुषविले. वेदगंगा ग्रामीण साहित्य संमेलन, अंकूर साहित्य संमेलनाच्या आयोजनात महत्त्वाची भूमिका त्यांनी बजावली. त्यांच्या इच्छेनुसार त्यांचे नेत्रदान करण्यात आले.
सौजन्य : दैनिक सामना