काहीच दिवसांपूर्वी अभिनेता पुष्कर जोग याने विमानतळावरून आपला सेल्फी इन्स्टाग्रामवर टाकत आपण डेहराडूनला जातोय असं म्हटलं होतं. तेथे कशाला हे मात्र त्याने तेव्हा स्पष्ट केले नव्हते. आता ते त्यानेच इन्स्टाग्राम पोस्टवरून उघड केलंय.
त्याच्या ‘अदृष्य’ या सिनेमाचे शूटिंग डेहराडूनला तेव्हा सुरू होणार होते. या सिनेमात प्रथमच तो बॉलीवूड अभिनेत्री मंजिरी फडणीस हिच्यासोबत काम करतोय. बॉलीवूडमधले गाजलेले सिनेमॅटोग्राफर कबीर लाल हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. त्यांनी यापूर्वी ‘वेलकम बॅक’, ‘परदेस’, ‘ताल’, ‘हम आपके दिल में रहते हैं’ वगैरे सुपरहीट चित्रपटांची सिनेमॅटोग्राफी केली आहे. निर्माते अजय सिंग हे आपल्या लव्हली वर्ल्ड प्रॉडक्शन्स या बॅनरअंतर्गत पुष्करच्या या मराठी चित्रपटाची निर्मिती करत आहेत.
पुष्कर जोग यानेच इन्स्टाग्रामवरीव आपल्या पेजवरुन या चित्रपटाची नुकतीच घोषणा केली. अलिकडेच पुष्कर या शूटींगसाठी डेहराडूनला रवाना झाला होता. तेव्हा त्याने एअरपोर्टवरचा एक व्हिडीओही त्याने शेअर केला होता.