अभिनेता माधव देवचके म्हटला म्हणजे आपल्या डोळ्यांपुढे ‘मोस्ट बॅलेन्स्ड बिग बॉस कंटेस्टंट’ असा तरुण येतो. त्याच्या चांगल्या वागणुकीमुळे प्रेक्षकांची त्याला चांगलीच पसंती मिळाली. बिग बॉस मराठीमधून प्रेक्षकांची मनं जिंकल्यानंतर टेलीव्हिजनवरचा हा लाडका अभिनेता सुभाष घई यांची निर्मिती असलेल्या ‘विजेता’ या सिनेमात एका महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकला.
त्यानंतर आता त्याला एका मोठ्या प्रोजेक्टमध्ये संधी मिळाली आहे. कमल हसन यांची मुलगी प्रसिद्ध अभिनेत्री श्रृती हसन हिच्यासोबत तो आता स्क्रीन शेअर करतोय. ही एक हिंदी वेबसिरीज आहे. ‘दी पॉवर’ नावाच्या हिंदी वेबसिरीजमध्ये हे दोघे एकत्र काम करत आहेत. विशेष म्हणजे या वेबसिरीजचं लेखन दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केलं आहे. माधव देवचकेने श्रृती हसनसोबत घेतलेला फोटो नुकताच इन्स्टाग्रामवर शेयर करत ही माहिती दिली आहे.
माधवसाठी मेजर थ्रोबॅक असलेल्या या वेबसिरीजमध्ये त्याच्यासह श्रृती हसन, अमोल पालेकर, विद्युत जामवाल, नसरुध्दीन शाह, जिशू सेनगुप्ता यांच्याही भूमिका आहेत.