ऑल्ट बालाजी आणि झी फाईव्ह लवकरच ‘एल एस डी – लव्ह, स्कँडल और डॉक्टर्स’ ही वेबसिरीज घेऊन येत आहेत. ही वेब मालिका पाहून जगात खरं काय आणि चुकीचं काय ते समोर येऊ शकेल. नुकतेच या वेबसिरीजचे ट्रेलर निर्मात्यांनी लाँच केले आहे. या रहस्यमय ट्रेलरवरूनच ही सिरीज कशावर बेतलेली आहे याची कल्पना येते.
एका हॉस्पिटलमध्ये कुठल्या परिस्थितीत एका रुग्णाचा अचानक मृत्यू होतो. त्या व्यक्तीचे प्रेम, त्याची वफादारी, त्याचे सच्चे इमान या सगळ्याचा हळूहळू उलगडा होत जाणार आहे हे स्पष्ट होते. या अनोख्या वेबसिरीजमध्ये राहुल देव, पुनीत पाठक, सिद्धार्थ मेनन, श्रुती मेनन, तानिया सचदेवा, सृष्टी ऋणदानी, मनीष मिश्रा, आयुष श्रीवास्तव, ईशान ए. खन्ना वगैरे कलाकारही तसेच दमदार घेण्यात आले आहेत.
पहिल्या भागापासूनच प्रेक्षक सिरीजमध्ये गुंतत जातील याची काळजी दिग्दर्शकाने घेतली आहे. या वेबसिरीजचे दिग्दर्शन साकिब पंडोर यांनी केलंय. त्यांनी यापूर्वी नेटफ्लिक्सवरील ‘सेक्रेड गेम्स’साठी दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्यासोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं. त्यांनी कश्यप यांना ‘बॉम्बे वेलवेट’साठीही दिग्दर्शन सहाय्य केलं होतं.