महाराष्ट्रातील पोलिसांसाठी एक लाख घरे बांधली जाणार, अशी महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली.
महाराष्ट्रातील पोलिसांसाठी एक लाख घरे बांधली जाणार, अशी महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली.
राज्यात पोलिसांसाठी घरे कमी आहेत. त्यामुळे ते बांधण्यासाठी आम्ही प्रयत्न सुरू केले आहेत. एखादा बिल्डर आपल्या जागेवर पोलिसांसाठी घर बांधून देत असेल, तर त्याला 4 एफएसआय आणि इतर सुविधा देण्याचा विचार सुरू आहे. ही सर्व घरं पोलीस हाऊसिंग कॉर्पेरेशनच्या नावानेच बांधली जाणार आहेत. जवळपास एक लाख घरे महाराष्ट्र पोलिसांसाठी बांधण्याची तयारी आम्ही केली आहे, असे अनिल देशमुख म्हणाले. कोरोनामुळे राज्य शासनाच्या भरवशावर राहून घर बांधली जाऊ शकणार नाही. त्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरुन पोलीस विभागातूनच घर बांधली जाईल, असेही अनिल देशमुख म्हणाले.