गेल्या काही दिवसांपासून सुरू केलेल्या शिवसेना सदस्य नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता शिवसेना विभाग क्र. 1ने नवं शिवधनुष्य हाती घेतले असून येत्या काळात तब्बल 2 लाख सदस्य नोंदणी पूर्ण करण्याचे उद्दिष्टे मनी बाळगले असून त्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मुख्य म्हणजे, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख यांच्या जयंतीचे औचित्य साधत पहिल्या टप्प्यातील 80 हजार नोंदणीच्या माहितीची सीडी विभागप्रमुख विलास पोतनीस यांनी युवा सेनाप्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केली आहे.
यावेळी शिवसेना उपनेते, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ-सभापती विनोद घोसाळकर, आमदार प्रकाश सुर्वे, सचिन अहिर युवासेना कार्यकारिणी सदस्य सिद्धेश कदम, विभाग संघटक सुजाता शिंगाडे, शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोशी, नगरसेविका तेजस्वी घोसाळकर , शीतल म्हात्रे, रिद्धी खुरसंगे, उपविभागप्रमुख पांडुरंग देसाई, विनायक सामंत, विधानसभा संघटक संजय भोसले, विनोद राजेशिर्पे, शाखाप्रमुख श्रीराम काटे, मिलिंद म्हात्रे, अमोल बोरकर, विपुल दारुवाले, सचिन म्हात्रे, भारतीय विद्यार्थी सेना, मुंबई कार्यकारिणी सदस्य आमोद गुप्ते, शाखासंघटक श्रृती परब, शरयू भोसले, अश्विनी जठार उपस्थित होते.