• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

पालिका करणार शेअर बाजारात एण्ट्री, विकासकामांसाठी कर्ज रोखे उभारणार

टीम मार्मिक by टीम मार्मिक
January 25, 2021
in घडामोडी
0
पालिका करणार शेअर बाजारात एण्ट्री, विकासकामांसाठी कर्ज रोखे उभारणार

आर्थिक मंदी आणि कोरोनामुळे मुंबई महापालिकेचा महसूल घटला आहे. त्याचा परिणाम मुंबईतील विकासकामांवर होऊ नये तसेच मुंबईकरांवर नव्या करांचा बोझा पडू नये, यासाठी महापालिका मुंबई शेअर बाजारात उतरण्याच्या तयारीत आहे. कर्ज रोखे विकून त्या माध्यमातून पैसे उभारण्याचा विचार पालिका करत आहे. गटनेत्यांच्या आगामी बैठकीत याबाबतचा प्रस्ताव मांडला जाणार आहे

जागतिक आर्थिक मंदी आणि आता कोरोनामुळे पालिकेचा  महसूल घटला आहे तर विविध उत्पन्नाचे स्रोत आटले आहेत. बांधकाम क्षेत्राला उभारी देण्यासाठी प्रीमियममध्ये 50 टक्के सवलत देण्यात आली आहे तर मालमत्ता कराची अपेक्षित वसुली झाली नाही. सर्व प्रकारचे उत्पन्न मिळून 2020-21मध्ये पालिकेचे सुमारे दहा हजार कोटींचे नुकसान झाले आहे. पालिकेला रस्ते, पाणी, पूल, घनकचरा, मलनिःसारण यासह विविध प्रकारच्या पायाभूत सुविधांच्या कामांसाठी दरवर्षी 10 ते 12 हजार कोटी रुपये लागतात.

जीएसटीचे वार्षिक सात ते आठ हजार कोटींचे उत्पन्न वगळता अन्य उत्पन्नांचा पर्याय सध्या पालिकेकडे नाही. बँकांमधील दीर्घ मुदतठेवी सुमारे एक लाख कोटींच्या घरात आहेत. मात्र त्यातील रुपये विविध विकास प्रकल्प, कर्मचार्‍यांचे पेन्शन व इतर कामांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. त्यामुळे मुदतठेवी मोडता येत नाहीत. यामुळेच विकासकामांसाठी लागणारे हजारो कोटी रुपये शेअर बाजारातून उभे ‘ण्याचा विचार पालिका करत आहे.

सौजन्य : दैनिक सामना 

Previous Post

पहिले दोन सामने प्रेक्षकांविना होणार, हिंदुस्थान-इंग्लंड कसोटी मालिका

Next Post

दोन लाख सदस्य नोंदणीचे शिवधनुष्य, विभाग क्रमांक 1चा नवसंकल्प

Next Post
राज्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरासोबतच हरित उर्जानिर्मितीस चालना देणार – मंत्री आदित्य ठाकरे

दोन लाख सदस्य नोंदणीचे शिवधनुष्य, विभाग क्रमांक 1चा नवसंकल्प

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.