सोशल माध्यमांवर सक्रीय असलेली अभिनेत्री हृता दुर्गुळे आपल्या नवनव्या प्रोजेक्ट्सची माहिती सतत इन्स्टाग्रामवर देत असते. लवकरच ती ‘अनन्या’ या सिनेमाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करतेय. मात्र कोरोना व्हायरसच्या प्रभावामुळे या सिनेमाचे शूटिंग सुरू झाले नव्हते. पण या काळात तिला आणखीही काही मराठी चित्रपटांच्या ऑफर्स मात्र भरपूर आल्या आहेत. यातलेच दोन चित्रपट तिने स्वीकारलेही आहेत. नुकत्याच एका पोस्टमधून आपण पल्लवी नावाच्या मुलीची भूमिका करणार आहोत हेही स्पष्ट केलं होतं. अगदी ताज्या पोस्टमध्ये तिने आपल्या ‘अनन्या’ या सिनेमाचे चित्रीकरण आपण सुरू करत असल्याची माहिती दिली आहे. हृता दुर्गुळे हिला छोट्या पडद्यावरील ‘फुलपाखरू’ या मालिकेमुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. आता ‘अनन्या’ या सिनेमामुळे ती रूपेरी पडदाही गाजवेल यात शंका नाही.