दोन अभिनेत्री असोत की दोन बहिणी… त्यांचं कधीच एकमेकींशी पटणार नाही अशीच आपली सर्वांची धारणा असते. बऱ्याच अंशी ते खरंही असलं तरी त्यालाही काही अपवाद आहेतच. आता मृण्मयी आणि गौतमी या दोघी देशपांडे बहिणींचंच बघा ना… दोघीही अभिनय क्षेत्रातच काम करत आहेत. दोघीही सुंदर आहेत. पण दोघींमध्ये जे घट्ट जीवाभावाचे नाते आहे त्याला तोड नाही.
त्यांना एकत्र धम्माल करताना बघितलं तर खूप मजा वाटते. एकीकडे मृण्मयीला नृत्याची आवड आहे तर गौतमीला गायनाची आवड आहे. या दोघी बहिणींचं उत्तम बॉण्डिंग बरेचदा इन्स्टाग्रामवर दिसून येत असते. आताही गौतमीने नुकताच एक व्हिडियो शेअर केला आहे. यामध्ये या दोघी बहिणींची क्युट बॉण्डिंग दिसतेय. या दोघींनीही ‘अच्छा जी मैं हारी चलो मान जाओ ना…’ या गाण्यावर गोड परफॉर्म करत हा व्हिडीओ बनवला आहे. यामध्ये गौतमी रुसली आहे तर मृण्मयी तिची समजूत काढताना दिसत आहे. या देशपांडे भगिनींच्या या व्हिडियोवर त्यांचे चाहते भरभरून लाईक्स आणि कमेंट्स करत आहेत.