संवेदनशील अभिनेत्री अमृता सुभाष हिच्या अभिनयाबाबत वाद असण्याचा संभवच नाही. कारण खरोखर ती एक गुणी अभिनेत्री आहे. नाटक असो, सिनेमा असो की वेबसिरीज वा लघुपट… प्रत्येक माध्यमात ती समरसूनच काम करते. त्याचे फळही तिला मिळतेच. लवकरच ‘द बूथ’ या एका लघुपटामधून प्रेक्षकांसमोर येते आहे. तिच्या या लघुपटाची दखल नुकतीच परदेशात घेण्यात आली आहे.
याबाबत बोलताना अमृता सुभाष म्हणते, फिल्म कम्पॅनियनच्या सर्वोत्तम समीक्षकांनी निवडलेल्या सर्वोत्तम चित्रपटांच्या यादीत ‘द बूथ’ या माझ्या लघुपटाची निवड झाली आहे. खूप आनंद झाला… कारण इतर सर्वोत्तम सिरिजमध्ये हा एकमेव लघुपट आहे. माझी सहकलाकार पर्ण पेठे, दिग्दर्शक रोहीन नायर, निर्माता विक्रमादित्य मोटवाने, छायालेखक स्वप्नील सोनावणे आणि सूत्रधार टीया सबॅस्टीन या सर्वांची मी ऋणी आहे… फिल्म कम्पॅनियन व अनुपमा चोप्राचे आभार! उमेश विनायक कुलकर्णीचे विशेष आभार… कारण त्याच्यामुळे या लघुपटाचा दिग्दर्शक रोहीन आणि माझी ओळख झाली.’ असेही ती पुढे स्पष्ट करते. अमृता या लघुपटात सिक्युरिटी गार्डच्या भूमिकेत दिसते आहे.