मुंबईत आज दिवसभरात 607 कोरोना रुग्णांची नोंद झाली तर दिवसभरात 789 जण कोरोनामुक्त झाले. दरम्यान, मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी वाढून 375 दिवसांवर पोहोचला आहे.
मुंबईत आज दिवसभरात 607 कोरोना रुग्णांची नोंद झाली तर दिवसभरात 789 जण कोरोनामुक्त झाले. दरम्यान, मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी वाढून 375 दिवसांवर पोहोचला आहे.
मुंबईतील विविध रुग्णालयात कोरोवर उपचार घेत असलेल्या आणि दीर्घकालीन आजार असणार्या 9 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या 11 हजार 219 वर पोहोचली आहे. मुंबईत कोरोनामुक्त होणार्यांची एकूण संख्या 2 लाख 81 हजार 642 वर पोहोचली आहे.
कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण 93 टक्क्यांवर आले आहे तर रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी 375 दिवसांवर पोहोचला आहे. मुंबईत सक्रीय रुग्णांची संख्या 7 हजार 332 वर पोहोचली आहे. दरम्यान, मुंबईत आतापर्यंत 25 लाख 49 हजार 307 चाचण्या झाल्या असून रुग्णांची संख्या 3 लाख 1 हजार 88 वर पोहोचली आहे.
कोरोनाविरोधात महाराष्ट्रभरात राबवण्यात आलेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेला चांगले यश आले असून राज्यात आज दिवसभरात 3 हजार 309 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून रिकव्हरी रेट 94.75 टक्क्यांवर पोहोचला आहे तर 3 हजार 579 कोरोना रुग्णांची नोंद झाली.
कोरोना पार्श्वभूमीवर, राज्यभरात सरकार आणि नगरपालिका, महानगरपालिकेकडून कोरोना रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. आज दिवसभरात कोरोनामुळे 70 जणांचा मृत्यू झाला तर मृत्यूदर 2.55 वर आला आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनाच्या 1 कोटी 36 लाख 23 हजार 299 चाचण्या झाल्या असून 19 लाख 81 हजार 623 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
सौजन्य : सामना