मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार अदानी इलेक्ट्रिसिटी आणि अदानी स्थानीय लोकाधिकार समिती 14 ते 28 जानेवारी 2021 या कालावधीत एमआयडीसी मरोळ, अंधेरी पूर्व येथे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा 2021 साजरा करणार आहे, यानिमित्ताने अदानी इलेक्ट्रिसिटीचे कर्मचारी आणि त्यांच्या मुलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
मराठी भाषा संवर्धन पंधरवडय़ानिमित्त अदानी इलेक्ट्रिसिटीच्या पुरुष कर्मचाऱयांसाठी मी एक वीज कर्मचारी, माझे सरकार -ठाकरे सरकार आणि कोरोना -एक महामारी आणि त्यानंतरचे जग या विषयांवर तर महिला कर्मचाऱयांसाठी वर्क फ्रॉम होम, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व ऑनलाईन शिक्षण पद्धती -फायदे आणि तोटे या विषयांवर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे .
शिवाय कर्मचाऱयांसाठी आगळ्या स्वाक्षरी स्पर्धेचेही आयोजन केले जाणार असून विजेत्यांना रोख पारितोषिक आणि सन्मानचिन्हाने सन्मानित करण्यात येणार आहे . अदानी इलेक्ट्रीसिटीच्या कर्मचाऱयांनी या स्पर्धांचा लाभ घेऊन मराठी भाषा संवर्धन पंधरवडा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन अदानी इलेकट्रीसिटी विद्युत कामगार सेनेचे अध्यक्ष वामन कदम व सरचिटणीस मंगेश दळवी, भारत दळवी, कैलास चव्हाण यांनी केले आहे.