हिंदुस्थान-ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये 15 जानेवारीपासून ब्रिस्बेन येथे चौथ्या कसोटीला सुरुवात होणार आहे. या कसोटीआधी हिंदुस्थानी संघाच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. टीम इंडियाच्या क्रिकेटपटूंना दुखापतींचे ग्रहण लागले आहे. त्यामुळे या महत्त्वाच्या कसोटीसाठी अंतिम अकरा जणांचा संघ निवडताना संघ व्यवस्थापनाचा कस लागेल हे निश्चित. याप्रसंगी टीम इंडियाच्या अंतिम अकरामध्ये कोणाला संधी मिळू शकते यावर दैनिक ‘सामना’ने टाकलेला हा प्रकाशझोत.
हे खेळाडू निश्चित खेळणार
कर्णधार अजिंक्य रहाणे, उपकर्णधार रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, मोहम्मद सिराज या खेळाडूंचे ब्रिस्बेन कसोटीतील अंतिम अकरामधील स्थान पक्के आहे.