अभिनेत्री मानसी नाईकने यावर्षी आपल्या वाढदिवशी चाहत्यांना सरप्राईजच दिले. यात तिने सोशल मिडीयावर आपल्या प्रेमाची कबुली दिली. प्रदीप खरेरासोबत ती रिलेशनशिपमध्ये असल्याचे तिने एका पोस्टद्वारे सगळ्यांना सांगितले. आता ही जोडी येत्या 19 जानेवारीला लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. एरवी इन्स्टाग्राम या सोशल मिडीयावर आपले सुरेख लुक्स शेअर करणारी मानसी लग्नासाठी कोणता लुक करणार याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना लागली आहे.
याबाबतच खुलासा करत मानसीने आपण लग्नात ‘जोधा अकबर’मधील ऐश्वर्या रायचा लुक करणार असल्याचे स्पष्ट केले. मानसी नुसती ऐशूसारखी दिसते असे नव्हे, तर ती सौंदर्यसम्राज्ञी ऐश्वर्या राय हिची खूप मोठी फॅन आहे. अनेकदा ती ऐश्वर्याच्या लुकमधील फोटो चाहत्यांशी शेअर करत असते. तिच्या चाहत्यांना तिचे ऐशूसारखे रूपडेच खूप आवडते हे वेगळे सांगायला नको.