‘कुमकुम भाग्य’ या झी टीव्हीवरील मालिकेने आपली लोकप्रियता कायम राखली आहे. लॉकडाऊननंतर पुन्हा प्रसारित होऊ लागलेल्या या मालिकेत रियाच्या भूमिकेत अभिनेत्री पूजा बॅनर्जी हिचा प्रवेश झाला आहे. रणबीर आणि प्राची यांच्या जीवनात रियाने बरेच नाट्य निर्माण केले आहे. या मालिकेच्या कथानकाला तिच्या व्यक्तिरेखेमुळे अनेक कलाटण्या मिळाल्या आहेत. शूटिंगमधूनच या अभिनेत्रीने नुकताच एक छोटा ब्रेक घेतला आणि तिने चंदिगडला भेट दिली.
पूजा एका पंजाबी गाण्याच्या चित्रीकरणासाठी चंदिगडला आली होती. गाण्याचे चित्रीकरण पार पडल्यावर तिने आपला मुक्काम एक-दोन दिवसांनी वाढविण्याचा निर्णय घेतला. त्याचे कारण तिला अस्सल चविष्ट आणि खमंग पंजाबी पदार्थांचा मनसोक्त आस्वाद घ्यायचा होता. बटर चिकन, मक्कये की रोटी, सरसों दा साग… अशा अनेक पंजाबी पदार्थांवर पूजाने अक्षरश: ताव मारला. तिला तेथील सध्याची थंड हवाही फार पसंत पडली असे ती इन्स्टाग्रामनर सांगते. आता ‘कुमकुम भाग्य’च्या पुढील चित्रीकरणासाठी ती मुंबईत परतली आहे.