सत्तरच्या दशकात गाजलेला ‘विश्वनाथ’ हा सिनेमा आठवतो तो शत्रुघ्न सिन्हा यांच्या खणखणीत अभिनयामुळे आणि रिना रॉयच्या गोड सौंदर्यामुळे. याच सिनेमाचा रिमेक बनला तर त्यात काम करायला नक्की आवडेल अशी भावना शॉटगन शत्रुघ्न सिन्हा यांच्या मुलाने लव्ह सिन्हा याने व्यक्त केली आहे. इन्स्टाग्रामवर आपले फोटो टाकत तो म्हणतो, वडिलांच्या ‘विश्वनाथ’ या सिनेमाच्या रिमेकचा हिस्सा व्हायला आवडेलच, पण मला सुपरव्हीलन किंवा अॅन्टी हीरो व्हायचंय. कारण नायकापेक्षा बरेचदा खलनायकच भाव खाऊन गेल्याची उदाहरणे आहेत. शोलेमधला गब्बर, वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई सिनेमातला दाऊद इब्राहिम, पद्मावत चित्रपटातील अलाउद्दीन खिलजी त्यातल्या नायकांहून जास्त लक्षात राहिले आहेत, असेही तो स्पष्ट करतो. नव्या वर्षातील आशा आकांक्षा आणि इच्छा व्यक्त करताना तो बोलत होता. आगामी ‘क्रिश-4’ सिनेमात तो नकारार्थी भूमिका साकारतोय. तो लवकरच ‘विश्वनाथ’च्या रिमेकवर काम सुरू करणार आहे.