स्वच्छता हाच उपाय
मुंबईत कबुतरे आणि कबुतरखाने मोठय़ा प्रमाणात आहेत. मात्र, पोल्ट्री पक्षी म्हणजे काsंबडय़ा सोडून इतर कोणत्याही पक्ष्यात हा रोग मोठय़ा संख्येने पसरत नाही. तरीही पक्षी घरातील असो की घराबाहेरचे ते राहत असलेली ठिकाणे ही स्वच्छ ठेवलीच पाहिजे, पिंजरे स्वच्छ ठेवलेच पाहिजे, स्वच्छता हाच यावरचा उपाय आहे, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.
पालिकेची आपत्कालीन यंत्रणा सज्ज
रस्त्यावर कोणताही पक्षी मरून पडला असेल तर त्याला हात लावू नये. असा पक्षी आढळल्यास पालिकेच्या 1916 या हेल्पलाइनवर संपर्प करण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. अशा तक्रारी निवारणासाठी आप्तकालीन विभाग, अथवा वॉर रुममार्फत कार्यवाही केली जाईल. घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या सहाय्यक अभियंताच्या आदेशानुसार कर्मचारी आणि कामगार मृत पक्ष्यांची विल्हेवाट लावतील.
दिवसभरात आज 70 तक्रारी
मुंबई महापालिकेच्या अहवालानंतर पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या 1916 या हेल्पलाईनवर आज दिवसभरात कावळे मेल्याच्या 70 तक्रारी आल्या. त्यामुळे पालिका प्रशासन अधिक सतर्प झाले आहे. शीव, माटुंगा, वडाळा, पुलाबा, अंधेरी, बोरिवली, कांदिवली यासह मुंबईच्या विविध भागातून लोकांनी तक्रारी केल्या. यात 95 टक्के तक्रारी कावळे मेल्याच्या तर 5 टक्के तक्रारी या कबुतरे मेल्याच्या आल्या, अशी माहिती पालिका आपत्कालीन विभागाने दिली.
सौजन्य : दैनिक सामना