खचाखच भरलेल्या सिंदफणा मध्यम प्रकल्पातील पाणी शेतीसाठी सोडण्यात आले मात्र शेतीसाठी सोडलेले हे पाणी थेट शिरूरच्या बाजारपेठेमध्ये घुसले. भरदिवसा अचानक आलेल्या पाण्यामुळे शिरूरमध्ये एकच गोंधळ उडाला.
खचाखच भरलेल्या सिंदफणा मध्यम प्रकल्पातील पाणी शेतीसाठी सोडण्यात आले मात्र शेतीसाठी सोडलेले हे पाणी थेट शिरूरच्या बाजारपेठेमध्ये घुसले. भरदिवसा अचानक आलेल्या पाण्यामुळे शिरूरमध्ये एकच गोंधळ उडाला.
शिरूर शहरानजिक असलेल्या सिंदफणा मध्यम प्रकल्प यंदा खचाखच भरला आहे. या प्रकल्पातील पाणी शेतीसाठी सोडावे अशी मागणी गेल्या काही दिवसापासून शेतकरी करत होते. ही मागणी डोळ्यासमोर ठेऊन शेतीसाठी गोमळवाडा येथील कॅनॉलद्वारे सकाळी पाणी सोडण्यात आले. मात्र जास्त दाबाने पाणी सोडल्याने हे पाणी शेतीऐवजी शिरूर शहरातील बाजारपेठेत घुसले. अचानक आलेल्या पाण्यामुळे बाजारपेठेत एकच गोंधळ आणि धावपळ उडाली. ज्या पाटातून पाणी सोडले त्यात असलेली घाण, अडथळे, ठिकठिकाणी असलेले लिकेज यामुळे जास्त दाबाचे पाणी शेतीत जाण्याऐवजी शहरात घुसले.
बीड रोडवर कॅनॉलवर असलेली आडवा सिमेंट पाईप वाहतुकीमुळे फुटला. पाटाच्या पाण्यातील कचरा आणि घाणीमुळे हा सिमेंटचा पाईप ब्लॉक झाला. त्यामुळे सोडलेले पाणी शेताऐवजी शहरामध्ये आले. तातडीने नगर पंचायतचे मुख्याधिकारी यांची मदत घेऊन हे काम पूर्ण करू असे अभियंता ए.बी.मिसाळ यांनी म्हटले.