प्रख्यात हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायक पंडित सी आर व्यास यांना मानवंदना देण्यासाठी ‘सीआर व्यास वंदना’चे आयोजन करण्यात आले आहे. 9 आणि 10 जानेवारी रोजी शिवाजी पार्क येथील वीर सावरकर सभागृह येथे दोन्ही दिवशी सायंकाळी 7 वाजता होणार आहे. या महोत्सवाला प्रवेश विनामूल्य आहे.
प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर आणि कोव्हीड-19ची महाराष्ट्र सरकारने घालून दिलेली सर्व मार्गदर्शक तत्वे पाळून रसिकांना प्रवेश दिला जाणार आहे. पहिल्या दिवशी सुगम संगीत क्षेत्रातील प्रख्यात गायिका सायली तळवलकर यांचे गायन होणार आहे. त्यानंतर पहिल्या दिवशी प्रख्यात सितारवादक पुर्बायन चॅटर्जी आपली कला सादर करणार आहेत. तर दुसऱ्या दिवशी 10 जानेवारी 2021 रोजी प्रख्यात गायिका अपर्णा केळकर सहभागी होणार आहेत. ‘सीआर व्यास वंदना 2021’ची सांगता प्रख्यात गायक राम देशपांडे यांच्या गायनाने होणार आहे. गायक राम देशपांडे यांना तबल्यावर मुपुंदराय देव आणि हार्मोनियमवर श्रीनिवास आचार्य साथ देणार आहे.