भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये अतिदक्षता नवजात केयर युनिटमध्ये (SNCU) भीषण आग लागल्याचं वृत्त आहे. या आगीत दहा अर्भकांचा मृत्यू झाला आहे. धुरामुळे गुदमरून या अर्भकांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

शनिवारी मध्यरात्री 2 वाजण्याच्या दरम्यान अचानक जिल्हा सामान्य रुग्णालयातील आऊट बोर्न युनिटमधून धूर निघत असल्याचे समोर आले. या युनिटमध्ये एकूण सतरा अर्भके होती.
खोलीतून धूर येत असल्याचं पाहून ड्युटीवर असलेल्या परिचारिकेने दार उघडून बघितलं. तेव्हा त्या खोलीमध्ये मोठ्या प्रमाणात धूर साचून राहिला होता. त्यामुळे त्यांनी लगेच दवाखान्यातील अधिकाऱ्यांना सांगितले.