• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा बहुमान नाशिकला मिळाल्याचा आंनद – छगन भुजबळ

टीम मार्मिक by टीम मार्मिक
January 8, 2021
in घडामोडी
0
94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा बहुमान नाशिकला मिळाल्याचा आंनद – छगन भुजबळ

94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिक शहरात होणार असल्याची घोषणा शुक्रवारी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी केली आहे. नाशिकला हा बहुमान मिळाला ही आपल्यासाठी अतिशय आनंददायी बाब असल्याची प्रतिक्रिया राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली आहे.

नाशिकमध्ये 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन व्हावे, यासाठी नाशिकच्या लोकहितवादी मंडळाकडून साहित्य मंडळाकडे मागणी केली होती. याबाबत लोकहितवादी मंडळातील काही सदस्यांनी आपली भेट घेऊन याबाबत चर्चा केली होती. त्यानुसार त्यांना संपूर्ण सहकार्य करण्याचे आपण कळविले होते. त्यानंतर आज साहित्य महामंडळाकडून नाशिकच्या लोकहितवादी मंडळाला संमेलन आयोजित करण्याचा मान मिळाला आहे. ही अतिशय आनंदाची बातमी असल्याचे भुजबळ यांनी म्हटले आहे.

नाशिकला साहित्य क्षेत्राची मोठी परंपरा आहे. अनेक दिग्गज साहित्यिक या भूमीने दिले आहे. या भूमीची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी होणे ही नाशिककरांसाठी अभिमानाची बाब आहे. हे संमेलन मार्च महिन्यात होणार आहे. नाशिकमध्ये होणारे हे संमेलन ऐतिहासिक होईल यासाठी आपण सर्वोतोपरी मदत देऊ, तसेच नाशिककरांच्या वतीने देशभरातून आलेल्या साहित्यिकांचा योग्य असा मान सन्मान ठेवला जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

सौजन्य : सामना 

 

Previous Post

बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी दुसऱ्या टप्प्यात 2 हजार 192 कोटींचा निधी वितरीत – विजय वडेट्टीवार

Next Post

सरकारचा शेतकरी नेत्यांना कोर्टात जाण्याचा सल्ला.. आठवी बैठकही निष्फळ, 15 जानेवारीला पुन्हा चर्चा

Next Post
सरकारचा शेतकरी नेत्यांना कोर्टात जाण्याचा सल्ला.. आठवी बैठकही निष्फळ, 15 जानेवारीला पुन्हा चर्चा

सरकारचा शेतकरी नेत्यांना कोर्टात जाण्याचा सल्ला.. आठवी बैठकही निष्फळ, 15 जानेवारीला पुन्हा चर्चा

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.