राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज चंद्रपूर जिल्ह्यातील घोडाझरी येथील कालव्याची पाहणी करण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात येत आहेत. गोसेखुर्द धरणाच्या उजव्या कालव्यातून निघणाऱ्या उपकालव्याच्या कामाची पाहणी मुख्यमंत्री करतील. दुपारी दीड वाजता त्यांचे नियोजित आगमन होणार आहे.