कलर्स वाहिनीवरील ‘नागिण-5’ या मालिकेच्या कथानकातील कलाटण्यांनी प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. म्हणूनच या गूढ कथेमध्ये आणखी थोडी रंजकता आणण्यासाठी प्रसिद्ध अभिनेता अरिजित तनेजा याला मालिकेत एका खास भूमिकेसाठी घेण्यात आले आहे. यात तो एक सशक्त कॅमिओ करताना दिसणार आहे. तो साकारत असलेली फरिश्ताची व्यक्तिरेखा एका देखण्या व आकर्षक पुरूषाची आहे, जो कोणत्याही स्त्रीला मोहिनी घालू शकेल असा आहे.
मात्र सभ्य व शांत अशा त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या मागे लपले आहे एक चौकस व्यक्तिमत्व, ज्यातील काळ्या छटा काही काळानंतर उलगडणार आहेत. या सुपरनॅचरल थरारक मालिकेतील आपल्या प्रवेशाबद्दल तो म्हणतो, नागिनसारख्या लोकप्रिय फ्रँचायजीमध्ये काम करणे खूपच आनंददायक आहे. हा रोल जरी कॅमिओ असला तरी माझ्यासाठी ही खूप मोठी संधी असल्याचे मी मानतो. कारण फँटसी हा प्रकार मी प्रथमच करतोय.