• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

राज्यातील गुंठेवारीची घरे नियमित होणार! सुमारे सवा लाख कुटुंबांना दिलासा मिळणार

टीम मार्मिक by टीम मार्मिक
January 7, 2021
in घडामोडी
0
राज्यातील गुंठेवारीची घरे नियमित होणार! सुमारे सवा लाख कुटुंबांना दिलासा मिळणार

अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला गुंठेवारीचा प्रश्न अखेर मार्गी लागला. शहरातील 118 वसाहतींमधील सुमारे सवा लाख घरांना नियमित करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. यामुळे सुमारे चार लाख नागरिकांना दिलासा मिळाला आहे. या निर्णयामुळे शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश आले आहे.

महानगरपालिका हद्दीतील अनधिकृतपणे विकसित झालेली गुंठेवारीतील घरे नियमित करण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे 31 डिसेंबर 2015 पर्यंत बांधण्यात आलेली गुंठेवारीतील सुमारे सवा लाख घरे नियमित होणार आहेत. गेली अनेक वर्षे गुंठेवारीतील घरे नियमित करण्याचा प्रश्न प्रलंबित होता. शिवसेनेकडून यासाठी वारंवार पाठपुरावा करण्यात येत होता.

संभाजीनगरचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत बैठक घेतली. त्यांच्या या प्रस्तावाला मंत्रिमंडळाने मान्यता दिली.

1 जानेवारी, 2001 च्या पूर्वी झालेल्या गुंठेवारी योजनांना गुंठेवारी नियमितीकरण अधिनियम हा कायदा मान्य करून त्याचा लाभ देण्यात आला होता. मात्र ज्या जमिनी अतिक्रमणाखाली आहेत अथवा विशिष्ट क्षेत्रामध्ये आहेत. (ना-विकास क्षेत्र, हरित क्षेत्र, पर्यटन क्षेत्र, पर्यावरणदृष्टय़ा संवेदनशील क्षेत्र, संरक्षण विभागाचे क्षेत्र इत्यादी.) त्यांना कायद्याप्रमाणे या योजनेचा लाभ घेता येत नाही.

या अधिनियमामुळे राज्यातील बरेच गुंठेवारी क्षेत्र नियमित असले तरीदेखील अद्यापि काही क्षेत्राचे नियमितीकरण प्रलंबित आहे. या सर्वांचा विचार करून सदर अधिनियमामध्ये अंमलबजावणीचा दिनांक वाढविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार आता दिनांक 31 डिसेंबर 2020 पर्यंत त्यांचे नियमितीकरण झालेले नाही त्यांना या अधिनियमातील दुरुस्तीचा लाभ घेता येईल.

सौजन्य : सामना 

Previous Post

इंजिनीयरिंगच्या दुसऱया वर्षाच्या प्रवेशासाठी चुरस, कॉलेजमध्ये 3 ते 6 जागांचाच कोटा

Next Post

टीआरपी घोटाळ्यासंदर्भात पोलिसांकडे सबळ पुरावे, राज्य सरकारची उच्च न्यायालयाला माहिती

Next Post
टीआरपी घोटाळ्यासंदर्भात पोलिसांकडे सबळ पुरावे, राज्य सरकारची उच्च न्यायालयाला माहिती

टीआरपी घोटाळ्यासंदर्भात पोलिसांकडे सबळ पुरावे, राज्य सरकारची उच्च न्यायालयाला माहिती

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.