राजस्थान, मध्य प्रदेश, झारखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये ‘बर्ड फ्लू’चा धोका वाढत आहे. यामुळे या राज्यांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. पक्षी आणि मानव यांच्यासाठी खतरनाक असणारा हा ‘बर्ड फ्लू’ हा आजार ‘एवियन इन्फ्लूएंजा वायरस’ (H5N1) या विषाणूमुळे होतो. ‘बर्ड फ्लू’ संक्रमित पक्षी किंवा प्राण्यांच्या संपर्कात आल्यास मानवालाही याची लागण होऊ शकते. यामुळे मृत्यूही ओढावू शकतो.
हा आजार कोंबड्या, टर्की, मोर आणि बदक यासारख्या प्राण्यांमध्ये वेगाने पसरतो. या आजार धोकादायक असून यामुळे प्राण्यांसह मानवाचाही मृत्यू होऊ शकतो.
ही आहेत लक्षणे
‘बर्ड फ्लू’ची लागण झाल्यास ताप, छातीत कफ होणे, नाक वाहणे, डोकेदुखी, घशात सूज येणे, स्नायुंना वेदना होणे, श्वसनास त्रास होणे, सतत उलट्या होणे, अस्वस्थ वाटणे अशी लक्षणे दिसतात. ही लक्षणे दिसल्यास तात्काळ रुग्णालय गाठा आणि डॉक्टरांकडून तपासणी करून घ्या.
अशी घ्या काळजी
– बर्ड फ्ल्यू झालेल्या पक्ष्यांपासून लांब रहा, बर्ड फ्ल्यूमुळे मृत्यू झालेल्या पक्षी, प्राण्यांपासून लांब रहा, बर्ड फ्ल्यूची साथ आली असेल तर मांसाहार टाळा, मांसाहाराची खरेदी करताना स्वच्छतेबाबत खात्री करून घ्या.
सौजन्य : दैनिक सामना