निर्माता, दिग्दर्शक करण जौहर नव्या वर्षात जोमाने कामाला लागले आहेत. त्यांनी आपल्या आगामी ‘मुंबईकर’ या सिनेमाचे पहिले पोस्टर आज सोशल माध्यमांवर शेयर केले. या निमित्ताने त्यांनी आपल्या चाहत्यांना नववर्षाचा तोहफाच दिला आहे. हे पोस्टर शेयर करताना कॅप्शनमध्ये ते म्हणतात, हा सिनेमा प्रेक्षकांना जबरदस्त सिनेमॅटीक अनुभव देईल याची मी खात्री देतो.
करण जोहर यांनी या पोस्टमध्ये आपल्या युनिट सदस्यांची तारीफही केली आहे. पोस्टरमध्ये मुंबईकर हे नाव मोठे दिसत असून त्यात यातले बहुतांश सगळे कलाकार सामावलेले आहेत. शिबू थामिन्स या दाक्षिणात्य प्रॉडक्शन डिझायनरचा हा पहिलाच बॉलीवूडपट आहे. संतोष सिवन या सिनेमाचे निर्माते आहेत. या सिनेमाचे पोस्टर आज केवळ करण जोहर यांनीच नव्हे, तर ‘बाहुबली’चे दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांनीही आजच ते सोशल माध्यमांवर शेयर केले आहे हे विशेष.