अहिल्याबाई होळकरांच्या जीवनाप्रवासाभोवती गुंफलेली ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’ ही ऐतिहासिक मालिका नव्या वर्षात सोनी टीव्हीवर दाखल होतेय. अहिल्याबाईंनी 18व्या शतकातील सामाजिक रूढींना आव्हान दिले, मर्यादा हटवल्या आणि महिला सशक्तीकरणाचा मार्ग खुला केला. प्रसिद्ध मराठी अभिनेत्री स्नेहलता वसईकर याच मालिकेत अहिल्याबाई होळकरांची सासू म्हणजे गौतमाबाई होळकर साकारणार आहे. आजवर तिने पडद्यावर काही अविस्मरणीय भूमिका केल्या आहेत. त्या पाहता या भूमिकेसाठी तिची निवड योग्यच आहे.
मल्हाररावांच्या पत्नीची भूमिका करण्याबद्दल स्नेहलता वसईकर म्हणते, गौतमाबाईंची भूमिका करण्याची ही संधी मला मिळाली आहे. मी स्वतः एक आई असल्यामुळे त्यांचा दृष्टिकोन, खंडेरावाबद्दलचे त्यांचे प्रेम आणि त्याचे संरक्षण करण्याची एका आईची खटपट मी समजू शकते. अहिल्याबाई अनेकांचे प्रेरणास्थान आहे. त्यांच्या सासूची भूमिका करणे हे आव्हानात्मक आणि रोमांचकही आहे. हा रोमांचक अनुभव घेण्यास मी आतुर आहे. मला ऐतिहासिक मालिका करायला आवडतात. कारण त्यातून प्रेक्षकांना त्यातून बराच बोध मिळू शकतो, असेही ती म्हणाली. ही मालिका 4 जानेवारीपासून दररोज सायंकाळी 7.30 वाजता दाखवली जाणार आहे.