हिंदुस्थानात 2020 मध्ये अनेक नवीन आणि हायटेक कार लॉन्च झाल्या आहेत. यामधील अनेक कारचे लूक अत्यंत स्टाईलिश आणि तुमच्या खिशाला परवडतील अशा आहेत. आज आम्ही तुम्हाला 2020 मध्ये लॉन्च झालेल्या सर्वात स्वस्त कार बद्दल माहिती सांगणार आहोत.
डिझेल पर्यायामध्ये 1.5 लिटर क्षमतेचे इंजिन
याच्या डिझेल व्हेरिएंट एक लिटर पेट्रोल इंजिन क्षमतेच्या मॉडेलची किंमत 8.79 लाख रुपयांपासून ते 11.17 लाख रुपयांपर्यंत आहे. कंपनीने डिझेल पर्यायामध्ये 1.5 लिटर क्षमतेचे इंजिन दिले आहे. याची किंमत 8.19 लाख ते 10.59 लाख रुपयांदरम्यान आहे.
Kia Sonet
Kia Motors हिंदुस्थानात आपली नवीन कॉम्पॅक्ट एसयूव्ही Kia Sonet सप्टेंबरमध्ये लॉन्च केली होती. Kia Sonet मध्ये रिफाईंड 1.5 सीआरडीआय डिझेल इंजिन देण्यात आले आहे. जे 6 स्पीड मॅन्युअल ट्रांसमिशन (100 पीएसची उर्जा पॉवर) आणि दुसरे (115 पीएसची पॉवर) 6-स्पीड अॅडव्हान्स एटीसह येते. तसेच याच्या पेट्रोल व्हेरिएंटमध्ये जी 1.0 टी-जीडीआय पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. जे 120 पीएसची पॉवर जनरेट करते. याचे इंजिन 6iMT आणि 7DCT स्मार्टस्ट्रीमसह येते.
सेफ्टी फीचर्स आणि किंमत
Kia Sonet मध्ये ड्युअल एअरबॅग, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, ईबीडी, रियर पार्किंग सेन्सर, इमरजेंसी स्टॉप सिग्नल अशी फीचर्स देण्यात आले आहेत. तसेच यात 26.03 सेमी टचस्क्रीन आणि 10.67 सेमी कलर क्लस्टर, स्मार्ट व्हेंटीलेटर सीट्स, मल्टी ड्राईव्ह मोड फीचर्स देण्यात आले आहे. Kia Sonet ची प्रारंभिक एक्स-शोरूम किंमत 6.71 लाख रुपये आहे.
Nissan Magnite
Nissan ने आपली सर्वात स्वस्त एसयूव्ही Magnite डिसेंबर महिन्यात लॉन्च केली होती. नवीन Magnite ला CMF-A + प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आले आहे. ज्याचा उपयोग ट्रायबरमध्येही केला गेला आहे. Magnite हिंदुस्थानात Nissan ची पहिली 4 मीटर एसयूव्ही आहे. ही एसयूव्ही XE, XL, XV आणि XV या चार व्हेरिेएंटमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. तसेच 9 वेगवेगळ्या कलर्समध्ये ही एसयूव्ही ग्राहकांसाठी उपलब्ध आहे.
इंजिन आणि किंमत
Nissan Magnite मध्ये कंपनीने 1.0 लिटर 3 सिलेंडर टर्बो पेट्रोल इंजिन दिले आहे. जे 72HP पॉवर जनरेट करेल. याच्या टॉप व्हेरिेएंटमध्ये 1.0 लिटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. जे 5-स्पीड मॅन्युअल आणि सीव्हीटी स्वयंचलित गिअरबॉक्ससह सुसज्ज असेल. एका विशेष योजनेनुसार कंपनीने याची प्रारंभिक किंमत 31 डिसेंबर 2020 पर्यंत 4.99 लाखा रुपये इतकी ठेवली आहे. 31 डिसेंबर नंतर याची प्रारंभिक किंमत वाढून 5.54 लाख रुपये असेल. ग्राहक 31 डिसेंबर 2020 पर्यंत कमी कंमतीत ही एसयूव्ही खरेदी करू शकतात.
सौजन्य- सामना