छोट्या पडद्यावर ‘दिल दोस्ती दुनियादारी’ ही मालिका खूपच गाजली. यात सहा दोस्तांची दोस्ती प्रेक्षकांना खूपच भावली. यातल्या प्रमुख पात्रांसोबतच इतर व्यक्तिरेखांनीही प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले. यातच रेश्माच्या नवऱ्याची प्रेयसी साकारणारी निशा म्हणजेच अभिनेत्री मंजिरी पुपाला… सध्या मंजिरीचा एक फोटो खूप व्हायरल होतोय. यात ती प्रेक्षकांना ख्रिसमसच्या निमित्ताने आगळ्यावेगळ्या शुभेच्छा देताना दिसतेय.
मंजिरीने हा फोटो इन्स्टाग्रामवर आपल्या पेजवर पोस्ट केला आहे. हा फोटो टाकल्यावर कॅप्शनमध्ये ती म्हणते, ‘केक आणि सेलिब्रेशनचा सध्या माहौल असल्याने तुम्हाला ख्रिसमसच्या शुभेच्छा देण्यासाठी हा फोटो अतिशय योग्य वाटतोय. म्हणून मी तो पोस्ट केला, असेही ती स्पष्ट करते. गमतीची बाब ही की, मंजिरीने आपल्या पूर्ण चेहऱ्याला आणि अंगाला हा केक लावला आहे. तिच्या या फोटोवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होतोय. ‘ग्रहण’ मालिकेद्वारे ती घराघरात पोहोचली. मंजिरी ही हिंदीतही बरीच लोकप्रिय आहे. मंजिरीने स्टार प्लस वाहिनीवरील ‘इश्कबाज’ या मालिकेतही एसीपी अदिती देशमुखची भूमिका साकारली होती. याशिवाय ‘पार्टी’ या मराठी सिनेमातही तिची भूमिका पाहायला मिळाली होती.