तुमच्या कार्यालयातील अमुक कर्मचारी फाइल पुढे सरकवण्यासाठी पैसे मागतो. अमुक कर्मचाऱयाचा पगार एवढा मग एवढी मालमत्ता कशी? निवृत्त झाल्यावरही ऐशारामात कसा जगतो? या अधिकाऱयाचे महिला कर्मचाऱयासोबत अनैतिक संबंध आहेत… अशा असंख्य निनावी तक्रारींचा मंत्रालयापासून जिल्हापातळीवरील शासकीय कार्यालयांत पाऊस पडत आहे. या निनावी तक्रारींचा अनेकदा प्रशासनही सोयीस्कररीत्या वापर करीत असल्याने हजारो कर्मचारी-अधिकारी चौकशीच्या फेऱयात अडकले आहेत आणि त्यांची बदली-बढती रखडली आहे.
कोणत्या विभागात खोटय़ा तक्रारींचे प्रमाण अधिक
- महसूल
- पोलीस
- ग्रामविकास
- जिल्हा परिषद
- नगरविकास
सरकारी नोकरीमध्ये काम करताना अधिकारी व कर्मचाऱयांचे अनेक हितशत्रू व हितचिंतक निर्माण होतात. एखाद्या अधिकाऱयाची बदली किंवा बढतीची वेळ आली की हमखास निनावी तक्रार येते. अनेकदा खोटय़ा नावाने व खोटी सही करून तक्रार होते. यामध्ये अनेकदा एजंट म्हणून काम करणाऱयांचे प्रमाण जास्त असते.
कोणत्या विभागात खोटय़ा तक्रारींचे प्रमाण अधिक
- महसूल
- पोलीस
- ग्रामविकास
- जिल्हा परिषद
- नगरविकास
यासंदर्भात महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे मुख्य सल्लागार ग. दि. कुलथे, अध्यक्ष विनोद देसाई व सरचिटणीस विनायक लहाडे यांनी मुख्य सचिव संजय कुमार यांना पत्र पाठवले आहे. खोटय़ा निनावी तक्रारींची दखल घेऊ नये, अशी मागणी या पत्रात केली आहे.