प्रजासत्ताक दिनासाठी दिल्लीत आलेल्या 150 सैनिकांना कोरोनाची लागण झाली आहे. प्रजासत्ताक दिन आणि सैन्य दिनाच्या कार्यक्रमात सामील होण्यापूर्वी सर्व सैनिकांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. तेव्हा 150 सैनिकांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पण्ण झाले आहे.
द हिंदू या वृत्तपत्राने याबाबत वृत्त दिले आहे. सर्व कोरोना पॉजिटिव्ह सैनिकांना दिल्लीच्या छावणीत क्वारंटाईन करण्यात आले आहे.
दरवर्षी राजधानी दिल्लीत प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. यावेळी दिल्लीत मोठ्या संख्येने सैनिक दिल्लीत येतात. सर्व सैनिक प्रजासत्ताक दिन आणि सैन्य दिनानिमित्त होण्यार्या संचलनात सामील होतात. यंदा कोरोनाचे सावट असताना राजपथावर त्याची तयारी सुरू आहे. या वेळी हिंदुस्थानने ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉनसन यांना निमंत्रण देण्यात आले होते. पण ब्रिटेनमध्येच कोरोनाचा नवा विषाणू आढळल्याने खळबळ उडाली आहे.
सौजन्य : दैनिक सामना