आपलं लहानपण सगळ्यांनाच पुन्हा हवं असतं. ते मोकळेपणाने स्वच्छंदी वागणं, आईबाबांचं प्रेम प्रत्येकाला हवंहवंसं असतं. ‘लहानपण देगा देवा’ या संत तुकारामांच्या ओळी आठवल्या की आपल्यालाही बालपणात हरवून जावंसं वाटतं आणि पुन्हा एकदा लहान व्हावसं वाटतं. असंच काहीसं अभिनेत्री ऋता दुर्गुळे हिलाही कधीतरी वाटतं. सोशल मिडीयावर अनेक कलाकार चाहत्यांसोबत त्यांच्या बऱ्याच गोष्टी शेयर करत असतात. कधी एखादा फोटो पोस्ट करून तर कधी एखादा व्हिडीओ पोस्ट करून सेलिब्रिटीज विविध गोष्टी पोस्ट करतात. यातच ऋता दुर्गुळे हिने आपल्या बालपणीचा फोटो हातात घेऊन एक खास गोष्ट चाहत्यांशी शेयर केली आहे. ऋता दुर्गुळेला बालपणीची ऋता आठवतेय.
ऋता तिचं बालपण प्रचंड मिस करतेय. म्हणूनच तिने आपल्या लहानपणीच्या फोटो घेतलेला आपला फोटो शेयर केला आहे. ऋता ही लहानपणी क्राय बेबी म्हणजेच रडूबाई होती हेदेखील ती या पोस्टमध्ये सांगते. ऋता तिच्या पोस्टमध्ये लिहिते, ‘ओके मी तिला मिस करतेय. लहानपणीच्या आठवणी, घरी परतण्याची वाट पाहू नाही शकत…’ असेही ती स्पष्ट करते.