वाढत्या प्रदूषणामुळे अनेक लोक इलेक्ट्रिक गाडय़ांचे पर्याय निवडत आहेत. ऍमेझॉननेदेखील यामध्ये उडी घेतली असून एक युनिक अशी सेल्फ ड्रायव्हिंग टॅक्सीचा प्रोटोटाइप तयार केला आहे. सध्या या कारची टेस्टिंग सुरू आहे. काही दिवसांपूर्वी अमेझॉनने झुक्स नावाचे एक स्टार्टअप खरेदी केले होते त्यावरूनच या कारचे नाव झूक्स ठेवण्यात आले आहे. या कारला स्टिअरिंग नाही. याचबरोबर गाडी पुढच्या आणि मागच्या दोन्ही दिशेने चालू शकते. कारची क्षमता चार प्रवाशांची असून नॉनस्टॉप ही गाडी 16 तास धावू शकते. सॅन फ्रान्सिस्को आणि लास वेगासमध्ये सध्या या कारचे टेस्टिंग सुरू आहे.
सौजन्य- सामना