• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

आंब्राई

Marmik Team by Marmik Team
October 1, 2026
in आंब्राई
0

डोनाल्ड ट्रम्प
लाडक्या बहिणींच्या मतांसाठी
त्यांनी वाटले दीड-दीड हजार
आम्ही देऊ प्रत्येकाला
पाच-पाच लाख, व्हाल बेजार

आहे तुमच्यात एवढी हिंमत
मतसौदा करण्याएवढी?
तुमची कुवत आहेच तेवढी
चिरीमिरी वाटण्याएवढी

माझ्यासारखे आहे तुमचे
मन मोठे आणि उदार?
स्वाभिमान मेला तुमचा
दिल्लीपुढे तुम्ही लाचार

 

 

एकनाथ शिंदे
सगळे विकत घेता येते
फेकला पाहिजे फक्त पैसा
लंडनसुद्धा विकत घेऊ
जेव्हा दलाल भेटेल तैसा

केव्हापासून मॅनेज केले
हे तुम्हाला कसे समजणार
अमितभाईही चाट झाले
पाहून झेप इंडियापार

जेव्हा सीएम होतो तेव्हाच
इंग्लिश भाषण केले पाठ
आता बोलणे कठीण आहे
मागचे पाठ, पुढचे सपाट

अमित शहा
महाराष्ट्रात सारख्या खेपा
मी उगाच नाही मारत
महाराष्ट्रात दिसतो मला
मतांसाठी मिनी भारत

तेव्हा मतदार होते भोळे
भरभरून टाकले दान
आता मात्र कठीण आहे
उडवून टाकतील दाणादाण

म्हणून करतो पायाभरणी
मारु पाहतो मी इंप्रेशन
जर का झालो त्यात यशस्वी
अगदी सोपी जाईल इलेक्शन

नरेंद्र मोदी
किती मान-सन्मान मोठा
मिळतो मला सार्‍या जगात
आपले लोक नाक मुरडतात
नाही देत इज्जत देशात

त्यांना माहीत नाहीच मुळी
मी आहे किती मोठा
अनेकांना शेंड्या लावून
त्यांचा केला चम्मनगोटा

विश्वगुरु म्हणून मला
सगळ्या जगात किती मानतात
जेन-झीची लब्बाड पोरे
मात्र माझी फिरकी ताणतात

देवेंद्र फडणवीस
हाही चांगला, तोही चांगला
सर्वांनाच न्याय देऊ
आतापर्यंत किती दिली
आश्वासने मोजून पाहू

हाही लाडका, तोही लाडका
सार्‍यांनाच सारखे तोलू
आतापर्यंत किती खोटे
बोललो त्याचे घाव झेलू

हाही खोटा, तोही खोटा
माहीत असून गोड बोलू
एकेकाची अंडी-पिल्ली
दाखवाया का पिंजरा खोलू?

Previous Post

हा मुळात आहे का समान नागरी कायदा?

Next Post

प्रबोधनकार आणि जवळकर

Next Post
गोव्यात सामाजिक क्रांतीचा एल्गार

प्रबोधनकार आणि जवळकर

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.