प्रसिद्ध संगीतकार नरेंद्र भिडे (47) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी मुक्ता आणि दोन मुले असा परिवार आहे.
सिव्हिल इंजिनीअरची पदवी घेतल्यानंतरही त्यांनी अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये कारकीर्द न करता संगीतामध्ये रमले. नरेंद्र भिडे यांनी शास्त्राrय संगीताचे शिक्षण उस्ताद महंमद हुसेन खान साहेब, स्वरराज छोटा गंधर्व, बाळासाहेब मते, शैला दातार, सुधीर दातार, सुहास दातार यांच्याकडे तर पाश्चिमात्य संगीताचे शिक्षण हेमंत गोडबोले यांच्याकडे घेतले. त्यांनी अनेक नाटक, मालिका, चित्रपट, जिंगल्सच्या माध्यमातून संगीतक्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. त्यांना श्रीकांत ठाकरे पुरस्कार, झी गौरव, सह्याद्री सिने अॅवॉर्ड, राज्य नाटय़ पुरस्कार, व्ही. शांताराम पुरस्कार, म. टा. सन्मान, राज्य चित्रपट पुरस्कार आदी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
बबडय़ा, फोन उचल! हे लोकं काहीपण बोलत आहेत!
संगीतकार नरेंद्र भिडे यांच्या निधनामुळे मराठी कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित या सहकलाकाराच्या आठवणी जागवल्या आहेत. संगीतकार अतुल गोगावले यांना मोठा धक्का बसला असून यावर विश्वासच बसत नसल्याचं त्यांनी म्हटलंय. अतुल यांनी फेसबुकवर अत्यंत भावूक पोस्ट लिहिली आहे. ‘बबडया.. फोन उचल.. हे लोकं काहीपण बोलत आहेत. प्लीज मला फोन’, अशा शब्दांत अतुल यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.
सौजन्य- सामना