कोरोनाच्या काळात मनमानी पद्धतीने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधात देशभरातील शेतकऱ्यांनी एकजूट दाखवत आज ‘हिंदुस्थान बंद’ची हाक दिली. शेतकऱ्यांच्या या बंदला जोरदार प्रतिसाद मिळाल्याचे चित्र दिसत आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी देखील आपल्या मागण्यांसाठी केंद्रातील मोदी सरकार विरोधात वज्रमूठ आवळल्याचे पाहायला मिळाले. पुणे, नाशिक, ठाणे, मुरबाड, जव्हार-मोखाडा अशा भागांमध्ये सर्व बाजारपेठांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.
https://www.instagram.com/p/CIhs37rpmp0/?utm_source=ig_embed
पुण्यात मार्केटयार्ड, भुसार बाजार, फळ बाजार, कांदे-बटाट्याचे व्यवहार सारे ठप्प होते. शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम असून मोदी सरकारची मनमानी चालू देणार नाही असं म्हणत शेतकरी आंदोलनास बसले आहेत. शेतकरी जनतेचं पोटं भरतो आणि तरी देखील केंद्र सरकार आमचं म्हणणं ऐकत नाही यामुळे शेतकरी संतापला आहे, अशा प्रतिक्रिया आंदोलक शेतकऱ्यांना दिला आहे.
https://www.instagram.com/p/CIhkji-JpOe/?utm_source=ig_embed
बाजार समिती कायदा टिकलाच पाहिजे, शेतीमालाला हमीभाव मिळालाच पाहिजे, शेतकरी आणि कामगार विरोधी विधेयके मागे घ्या अशा मागण्या शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहेत. पंजाब-हरियाणातून सुरू झालेलं शेतकरी आंदोनाचं लोण साऱ्या देशभरात पसरलं आहे. केंद्रातील मोदी सरकारने जबरदस्ती लागू केलेले कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या हिताच्या विरोधातील आहेत असं म्हणत बळीराजा पेटून उठला आहे. दिल्लीच्या सीमा भागात शेतकरी गेल्या काही दिवसांपासून कडाक्याच्या थंडीत देखील ठाण मांडून बसले आहेत. शेतकऱ्यांचे हे आंदोलन मोडून काढण्याचे सर्व प्रयत्न मोदी समर्थकांकडून सोशल मीडियाद्वारे करण्यात येत होते. मात्र शेतकऱ्यांची एकजूट कायम राहिली, मंगळवारी देशभरातील शेतकऱ्यांनी ‘हिंदुस्थान बंद’ची हाक दिली.
पश्चिम बंगालमध्ये शेतकरी संघटनांनी मोर्चे काढले. बिहारमध्ये रास्तारोकाच्या प्रयत्नात काही कार्यकर्त्यांनी रस्त्यावर टायर पेटवले. देशातील जवळपास सर्वच बाजारापेठा आज ठप्प असल्याचे चित्र सकाळपासून दिसत आहे. एक दोन ठिकाणी टायर जाळल्याचे चित्र असले तरी मोठ्या प्रमाणावर आंदोलन शांततेत सुरू असल्याचे दिसत आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नजरकैदेत
गृहमंत्रालय के आदेशों पर दिल्ली के मुख्यमंत्री @ArvindKejriwal को हाउस अरेस्ट किया गया है।
किसान आंदोलन का समर्थन करने की वजह से भाजपा ने दिल्ली के मुख्यमंत्री को हाउस अरेस्ट किया। #आज_भारत_बंद_है #BJPHouseArrestsKejriwal pic.twitter.com/VONXCD0R9G
— AAP (@AamAadmiParty) December 8, 2020
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सोमवारी सिंधु बॉर्डरवर शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी पोहोचले होते. त्यानंतर घरी परतल्यावर दिल्ली पोलिसांनी केजरीवाल यांना घरातच नजरकैद केल्याचा आरोप आम आदमी पक्षाने (आप) केला आहे. आपच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की केजरीवाल यांच्या घराबाहेर सुरक्षा वाढण्यावण्यात आली असून त्यांना घराबाहेर पडू दिले जात नसल्याचे आपचे म्हणणे आहे. सरकारकडून मात्र हे वृत्त फेटाळण्यात आले आहे. केजरीवाल यांना नजरकैद केले नसल्याचे प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे. मात्र केजरीवाल यांना अद्याप घराबाहेर पडू दिलेले नाही.
https://twitter.com/AamAadmiParty/status/1336183596118278144?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1336183596118278144%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.saamana.com%2Fbharat-bandh-8-december-farmers-protest-new-farm-laws-modi-govt%2F
सौजन्य- सामना