पहिलं प्रेम जसं आपण विसरू शकत नाही, तसंच आपल्या आयुष्यात घडलेले चांगले प्रसंगही आपल्याला विसरता येत नाहीत. म्हणूनच कलाकारांना अभिनयाची संधी देणारा पहिला चित्रपट विसरता येत नाही. अभिनेत्री केतकी माटेगावकर हिनेही नुकताच ‘टाईमपास’ हा आपला पहिला सिनेमा आठवला. तिने मग ही आठवण लगेच इन्स्टाग्रामवर चाहत्यांशी शेयर केली. या सिनेमात ती खूपच वेगळी दिसली. या सिनेमात तिने साकारलेली साधी भोळी प्राजक्ता (पराजू) प्रत्येकालाच आवडली. या सिनेमातील दगडू आणि तिची केमिस्ट्रीही सुपरहिट ठरली होती.
या सिनेमातील एक आठवण केतकीने शेअर केली आहे. आपल्या पोस्टमध्ये केतकी म्हणते, ‘मला नेहमीच सुरेख रोमॅंटिक सिनेमा हवा होता. ज्या सिनेमात पाऊस, रोमान्स, निरागसपणा, हास्य, प्रेम आणि सगळंच असेल. या सिनेमाने मला सगळंच दिलं… आणि बाकीचं तुम्हाला माहिती आहेच, असंही ती सांगते. ‘टाईमपास’ हा रवी जाधव यांनी दिग्दर्शित केलेला सिनेमा लोकांना खूपच आवडला होता. या सिनेमातील मधूर गाणी, डायलॉग्ज आणि इतर कलाकारांची केमिस्ट्री रसिक विसरू शकत नाहीत.