• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

    (ना)पाक मनसुब्यांना हातभार कशाला?

    हिंदीचा बुलडोझर रोखायला हवा!

    रामशास्त्री बाणा दिसेल का?

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    प्रश्न जिथे दफन होतात…

    Trending Tags

  • मनोरंजन

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    खेळकर, खोडकर ‘फार्स’नाट्य!

    शिवरायांचे नाव त्यांनी सन्मानाने धारण केले…

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

    (ना)पाक मनसुब्यांना हातभार कशाला?

    हिंदीचा बुलडोझर रोखायला हवा!

    रामशास्त्री बाणा दिसेल का?

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    प्रश्न जिथे दफन होतात…

    Trending Tags

  • मनोरंजन

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    खेळकर, खोडकर ‘फार्स’नाट्य!

    शिवरायांचे नाव त्यांनी सन्मानाने धारण केले…

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

शेतकऱ्यांचा उद्या ‘हिंदुस्थान बंद’!

Rujuta Kawadkar by Rujuta Kawadkar
December 8, 2020
in घडामोडी
0
शेतकऱ्यांचा उद्या ‘हिंदुस्थान बंद’!

कृषी कायदा मागे घ्यावा यासाठी दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकऱयांच्या आंदोलनाला 11 दिवस उलटल्यानंतरही पेंद्रातील मोदी सरकार तोडगा काढण्यात अपयशी ठरले आहे. त्यामुळे संतप्त शेतकरी संघटनांनी आता आर या पारचा इशारा दिला असून मंगळवारी 8 डिसेंबर रोजी ‘हिंदुस्थान बंद’चा इशारा दिला आहे. शेतकऱयांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत या आंदोलनाला देशभरातील 18 प्रमुख पक्षांसह असंख्य संघटनांनी पाठिंबा देत बळीराजाचा आवाज बुलंद केला आहे. आंदोलनात बोगस शेतकरी आहेत, असे भयंकर वक्तव्य कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी यांनी केल्याने शेतकऱयांमध्ये संतापाची लाट उसळली असून सिंधू बॉर्डरवर आज झालेल्या मॅरेथॉन बैठकीत केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलनाची धार अधिक तीव्र करण्याचा निर्धार शेतकऱयांनी केला आहे. दरम्यान, बॉक्सिंगपटू विजेंदरकुमार याने कृषि कायदे मागे घ्या अन्यथा ‘खेलरत्न’ पुरस्कार परत करेन असा इशारा दिला आहे.

कृषि कायदे परत घेण्यासाठी पंजाब व हरयाणातील शेतकऱयांनी दहा दिवसांपासून आंदोलन सुरू केले आहे. शेतकऱयांनी दिल्लीकडे येणारे सर्व मार्ग बंद केले आहेत. कोणत्याही परिस्थितीत कायदे मागे घेतल्याशिवाय आंदोलनही मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका शेतकऱयांनी घेतली आहे. शेतकऱयांचा रुद्रावतार पाहून सटपटलेल्या मोदी सरकारने चर्चेचे गुऱ्हाळ सुरू केले. परंतु कायदा मागे घेण्यावर मात्र सरकारने चकार शब्दही काढलेला नाही. त्यामुळे पाचव्यांदा चर्चा वांझोटीच ठरली. अखेर शेतकऱयांनी तुमच्याकडे नवे काही सांगण्यासारखे असेल तर बोला, अन्यथा वेळ वाया घालवू नका, असे खडे बोल सुनावले. त्यानंतर शेतकऱयांनी 8 डिसेंबर रोजी संपूर्ण ‘हिंदुस्थान बंद’ची हाक दिली आहे. या आंदोलनाला देशभरातील अनेक राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना, खेळाडू, साहित्यिकांनी पाठिंबा दिला आहे. सरकारने 9 डिसेंबरला चर्चा करण्याची तयारी दर्शविली असून या बैठकीत सरकार काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण देशाची लक्ष लागले आहे.

– मोदी सरकारचा हट्ट

आपल्या मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक झाले असतानाच केंद्र सरकारने आज कृषि कायदे मागे घेणार नसल्याचे संकेत दिले. केंद्रीय कृषि राज्यमंत्री कैलाश चौधरी यांनी आंदोलनात बोगस शेतकरी असल्याचे वक्तव्य केले. शेतकऱयांनी राजकारणाच्या चक्रव्युहात फसू नये असा सल्ला देतानाच सरकार आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे सांगितले. कोंडी फोडण्यासाठी मध्यममार्ग काढला जाईल असेही ते म्हणाले.

तर आंदोलन दिल्लीपुरते सीमित राहणार नाही

संपूर्ण देशाच्या शेती आणि अन्नपुरवठय़ात सर्वात जास्त योगदान पंजाब आणि हरयाणातील शेतकऱयांचा आहे. देशातील गहू आणि तांदळाची गरज हे शेतकरी भागवतातच त्याचबरोबर जगातील 17/18 देशांना हिंदुस्थान धान्य पुरवतो. त्यातही या शेतकऱयांचा मोठा वाटा आहे. ज्यावेळी ते रस्त्यावर येतात तेव्हा त्याची गंभीर दखल घेतलीच पाहिजे, पण ती घेतली गेलेली नाही. त्यामुळे हे असेच चित्र राहिले तर हे आंदोलन दिल्लीपुरते सिमीत राहणार नाहीत, असा इशारा शरद पवार यांनी केंद्र सरकारला दिला.

– डबेवाल्यांचा शेतकऱ्यांना पाठिंबा

नव्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱयांनी दिल्लीत सुरू केलेल्या आंदोलनाला डबेवाल्यांनीही पाठिंबा जाहीर केला आहे. शेतकऱयांना विश्वासात न घेता मोदी सरकारने विधेयके मंजूर केली. मात्र यामुळे शेतकरी देशोधडीला लागणार आहे. बडे भांडवलदार शेती व्यवस्थेत उतरल्याने शेतकरी हद्दपार होईल अशी भिती आहे. शेतकऱयांचे हे आंदोलन केंद्र सरकारकडून दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. शेतकऱयांचे आंदोलन चिरडण्याचा सरकारचा हा प्रयत्न अमानुषच आणि निषेधार्ह आहे. त्यामुळेच शेतकऱयांना पाठिंबा जाहीर करीत असल्याचे मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी सांगितले.

शरद पवार घेणार राष्ट्रपतींची भेट

पाचवेळा बैठक होऊनही कोणताही तोडगा न निघाल्याने शेतकरी प्रचंड आक्रमक झाले आहेत. या विषयावर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत. 9 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता पवार राष्ट्रपतींना भेटणार आहेत.

तुमची ‘मन की बात’ ऐकली, आता आमचे ऐका

सिंघू बॉर्डरवर आज आंदोलनात सहभागी झालेल्या जवळपास 40 संघटनांची मॅरेथॉन बैठक झाली. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना किसान युनियनचे महासचिव जगमोहनसिंग यांनी कित्येक वर्षे आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘मन की बात’ ऐकली आता त्यांनी आमचे म्हणणे ऐकावे असे म्हटले. सरकारने विचार करण्यासाठी वेळ मागितला आहे. तुम्ही कार्पोरेट घराणे वा नागपुरात आरएसएसशी चर्चा करताहेत का, असा टेलाही त्यांनी लगावला.

  • महाराष्ट्र-गुजरातसह हजारो शेतकरी 8 डिसेंबरच्या बंदसाठी दिल्लीत धडकणार आहेत.
  • काँगेसचे नेते आणि कार्यकर्ते देशात ठिकठिकाणी धरणे आंदोलन करणार आहेत.
  • 9 डिसेंबरच्या बैठकीत सरकारने निर्णय घेतला नाही तर दिल्लीतील सगळे रस्ते ब्लॉक करण्याचा इशारा शेतकऱयांनी दिला आहे.
  • एक वर्ष आंदोलन सुरू ठेवण्याइतकी व्यवस्था आमच्याकडे आहे, असे शेतकऱयांनी सरकारला ठणकावले आहे.

शेतकऱयांच्या आंदोलनाला शिवसेनेचा पाठिंबा मिळावा यासाठी शिरोमणी अकाली दलाचे नेते खासदार प्रेमसिंग चंदूमाजरा यांच्यासह शिष्टमंडळाने रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. उद्धव ठाकरे यांनी शेतकऱयांच्या प्रश्नांबाबत आस्थेवाईकपणे विचारपूस केली तसेच शेतकऱयांच्या पाठीशी शिवसेना ठामपणे उभी असल्याची ग्वाही दिली.

 

सौजन्य- सामना

Previous Post

जगाला दिशा देणारा महामानव आपल्या राज्यात झाला याचा अभिमान – मुख्यमंत्री

Next Post

महाराष्ट्राच्या हितासाठी मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर रक्तदान यज्ञ

Related Posts

घडामोडी

मुळ्येकाकांचा माझा पुरस्कार!

April 4, 2025
घडामोडी

मराठी चित्रपटांना आता एक पडदा थिएटर्सचा आधार?

March 20, 2025
घडामोडी

सेन्सेक्सची गटांगळी, अर्थव्यवस्थेची डुबकी

March 7, 2025
घडामोडी

आजकालचे अभंग

February 7, 2025
Next Post
फक्त पाच ते सात दिवसांचाच रक्तसाठा चला…रक्तदान करूया! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

महाराष्ट्राच्या हितासाठी मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर रक्तदान यज्ञ

भारताप्रमाणे ऑस्ट्रेलियात देखील अदानी ग्रुपला विरोध केला जातोय, कारण काय?

भारताप्रमाणे ऑस्ट्रेलियात देखील अदानी ग्रुपला विरोध केला जातोय, कारण काय?

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021
माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

September 8, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 8, 2025

मंत्री, आमदारांना उन्हाळ्याची सुटी?

May 8, 2025

राशीभविष्य

May 8, 2025

करंजी : नांदी शुभशकुनाची…

May 8, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 8, 2025

मंत्री, आमदारांना उन्हाळ्याची सुटी?

May 8, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.