• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

फटकारे बाळासाहेबांचे

फटकारे बाळासाहेबांचे

marmik by marmik
April 25, 2026
in बाळासाहेबांचे फटकारे
0
फटकारे बाळासाहेबांचे

हे व्यंगचित्र आहे १९८१ सालातलं. हे वर्ष भारत-अमेरिका संबंधांमधलं एक तणावपूर्ण वर्ष होतं. हॉलिवुडमध्ये वेस्टर्नपटांमध्ये काऊबॉय साकारून नावारूपाला आलेले रोनाल्ड रीगन हे अभिनेते रिपब्लिकन पक्षातर्फे अमेरिकेच्या अध्यक्षपदापर्यंत पोहोचले होते. भारताने अणुभट्टीसाठी वापरलेल्या इंधनावर प्रक्रिया करून त्या इंधनाचा फेरवापर चालवला आहे, असा ठपका ठेवून तारापूरच्या अणुभट्टीला युरेनियमचा पुरवठाच करायचा नाही, अशी भूमिका त्यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारने घेतली होती. १९७८ साली अस्तित्त्वात आलेल्या अण्वस्त्रप्रसारबंदी कराराची पूर्वलक्ष्यी पद्धतीने अंमलबजावणी करून ते भारताच्या आण्विक प्रगतीला ब्रेक लावू इच्छित होते. अणुइंधन करार रद्द करण्याचा रीगन यांचा मनसुबा जाहीर झाल्यावर संतप्त बाळासाहेबांनी त्याला बेबंद गोळीबार करणार्‍या थयथयाटी काऊबॉयच्या रूपात रेखाटलं आहे… त्याच्या गोळीबारात अमेरिकेची ओळख असलेल्या स्वातंत्र्यदेवीच्या पुतळ्याचा एक हात तुटतो आहे, असं चित्रण त्यांनी केलं आहे… आज अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जो जगभर उच्छाद माजवला आहे आणि त्यातून अमेरिकेची जी काही जगभर नालस्ती होते आहे, ती पाहिल्यावर बाळासाहेबांनी त्यांना स्वातंत्र्यदेवीचा पुतळा उखडून टाकणार्‍या माथेफिरूच्याच रूपात दाखवले असते कदाचित!

Previous Post

टिळक स्मारक मंदिर कॅन्टीनचा बटाटेवडा!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.