• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

बाळासाहेबांचे फटकारे

बाळासाहेबांचे फटकारे

marmik by marmik
April 2, 2026
in बाळासाहेबांचे फटकारे
0
बाळासाहेबांचे फटकारे

२ एप्रिल १९७८ या तारखेच्या मार्मिकचे हे मुखपृष्ठचित्र आहे. बाळासाहेबांच्या टिपिकल शैलीत अतिशय जिवंत अ‍ॅक्शन चित्रित करणारं… आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधींच्या काँग्रेस पक्षातल्या विरोधकांनी उठाव करून समाजवाद्यांपासून कम्युनिस्टांपर्यंत सर्व विरोधकांची एक मोट बांधली होती. त्या खिचडी पक्षाचं नाव होतं जनता पक्ष. त्यात तेव्हाचा जनसंघ नावाचा उंटही घुसला होता. काँग्रेसच्या विरोधात एखाद्या मुद्द्यावरून रान पेटवायचं, लोकांची दिशाभूल करणारं आंदोलन भलत्याच लोकांकरवी सुरू करायचं आणि त्यात अलगद घुसून त्याचा फायदा घेऊन आपल्या शिडात हवा भरून घ्यायची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नीती पहिल्यापासूनची. याच तथाकथित दुसर्‍या स्वातंत्र्यलढ्याचीच पुनरावृत्ती त्यांनी अण्णा हजारे यांच्या तथाकथित भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाला हवा देऊन नंतरही केली. जनता पक्षात स्थिरस्थावर झाल्यावर जनसंघीयांनी आपले मूळ रंग दाखवायला सुरुवात केली, तेव्हा ईएमएस नंबूद्रीपाद या कम्युनिस्ट नेत्याने त्यावरून रणकंदन केलं. जनता पक्षाला चरणसिंग यांच्या रूपात दाखवून बाळासाहेबांनी आरएसएसला एका माशीच्या स्वरूपात दाखवलं आहे आणि ती मारण्यासाठी नंबूद्रीपाद मोठा हातोडा घेऊन धावत आहेत. ही राजाने पाळलेल्या आणि त्याचंच नाक कापणार्‍या माकडाची गोष्ट आहे वेगळ्या स्वरूपात… पण, ही माशी गांधीलमाशी बनून कशी सगळ्या लोकशाही यंत्रणांना डसत गेली, तिने कशी सगळी संविधानिक मूल्य नासवली आणि किती घातक रूप धारण केलं, ते आज बाळासाहेबांनी पाहिलं असतं तर ते बेधडकपणे म्हणाले असते, साला लालभाई बरोबर होता तेव्हा!

Previous Post

साखरपुडा

Next Post

परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन…

Next Post
परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन…

परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन...

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.