• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

व्यंगचित्रकारांच्या हक्काच्या ‘कार्टूनिस्ट्स कंबाईन’ची नोंदणी!

गौरव सर्जेराव (विशेष लेख)

marmik by marmik
March 4, 2026
in इतर
0
व्यंगचित्रकारांच्या हक्काच्या ‘कार्टूनिस्ट्स कंबाईन’ची नोंदणी!

काही महिन्यांपूर्वी आम्ही काही तरुण व्यंगचित्रकारांनी एक ठाम निर्धार केला होता की व्यंगचित्रकारांची एक हक्काची, अधिकृत आणि पारदर्शक संस्था उभी करायची. ‘कार्टूनिस्ट्स कंबाईन’ ही केवळ एक संस्था नाही, तर तो एक विचार आहे, एक चळवळ आहे आणि व्यंगचित्रकारांच्या स्वाभिमानाची ओळख आहे. जगप्रसिद्ध व्यंगचित्रकार आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुढाकाराने या संस्थेचा पाया रचला गेला. ‘कार्टूनिस्ट्स कंबाईन’ हे नावसुद्धा त्यांनीच दिले. महाराष्ट्रातील व्यंगचित्रकारांना केवळ राज्यातच नव्हे, तर देशभर आणि जगभर ओळख मिळावी, त्यांना सन्मान मिळावा, त्यांच्या कलेला योग्य व्यासपीठ मिळावे हा त्यामागील दूरदृष्टीचा विचार होता.
पुढील काळात या संस्थेतर्फे   काही कार्यक्रम झाले, प्रदर्शनं भरवली गेली; पण संस्था अधिकृत नोंदणीच्या दिशेने मात्र कधीच गेली नाही. तसे अनेक प्रयत्न झाले, पण ते पूर्णत्वास गेले नाहीत. कालांतराने काही व्यक्तींनी संस्थेवर बोगस एकाधिकारशाही गाजवण्यास सुरुवात केली. त्यात पारदर्शकता नव्हती, लोकशाही मूल्यांचा अभाव होता आणि सामान्य व्यंगचित्रकारांपर्यंत निर्णयप्रक्रियेचा सहभाग पोहोचत नव्हता.

व्यंगचित्रकारांच्या हक्कांसाठी, त्यांच्या स्वातंत्र्यासाठी आणि सन्मानासाठी ठाम उभी राहणारी संस्था आजच्या काळात अत्यंत गरजेची आहे. कलाकारांवर वाढती दडपशाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर होणारे आघात आणि सामाजिक राजकीय दबाव पाहता त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील अशी अधिकृत आणि सक्षम संघटना असणे आवश्यक होते. म्हणूनच आम्ही तरुणांनी पुढे येत ही जबाबदारी स्वीकारली आहे.

संस्था सगळ्यांची असेल तर ती लोकशाही पद्धतीने चालली पाहिजे हा आमचा ठाम विश्वास होता. त्यामुळे अनधिकृत कार्यकारिणी बरखास्त करण्यासाठी आम्ही प्रयत्न सुरू केले. संस्था सहकारातून उभी राहावी, प्रत्येक व्यंगचित्रकाराचा त्यात सहभाग असावा म्हणून आम्ही देणगीच्या माध्यमातून नोंदणी करण्याचा प्रस्ताव मांडला. आनंदाची आणि अभिमानाची बाब म्हणजे तब्बल ४७ व्यंगचित्रकारांनी आमच्यावर विश्वास ठेवून नोंदणीसाठी देणगी दिली. हा केवळ आर्थिक पाठिंबा नव्हता; तो आमच्या प्रामाणिकतेवर ठेवलेला विश्वास होता. त्या विश्वासाने आमचा आत्मविश्वास अनेक पटींनी वाढला.

गेल्या पाच महिन्यांत आम्ही सर्व कायदेशीर सोपस्कार पूर्ण केले. कागदपत्रांची पूर्तता, शासकीय प्रक्रिया, आवश्यक मंजुरी या सर्व टप्प्यांतून जात अखेर ‘कार्टूनिस्ट्स कंबाईन’ ही संस्था अधिकृतपणे नोंदणीकृत झाली आहे, ही अतिशय आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे आमच्यासाठी. कारण, ही केवळ एक नोंदणी नाही, हा व्यंगचित्रकारांच्या स्वाभिमानाचा विजय आहे.

व्यंगचित्रकलेचा प्रचार प्रसार, व्यंगचित्रकारांचे हक्क संरक्षण, नवोदितांना व्यासपीठ, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख, कार्यशाळा, प्रदर्शनं, कायदेशीर मदत आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची लढाई या सर्व दिशांनी ही संस्था नव्या दमाने आणि नव्या उमेदीने काम करेल. संस्थेचा लोगो आणि नाव आम्ही ट्रेडमार्क केले आहे, त्यामुळे त्याचा दुरुपयोग कुणी करू शकणार नाही. आम्ही लवकरचं एक उत्कृष्ट संमेलन घेण्याच्या तयारीत आहोत. सदस्य नोंदणी सुरू झाली आहे. संस्थेचे सचिव धनराज गरड यांची संकल्पना असलेले ‘व्यंगचित्राचे गाव’ पुण्यातील गोर्हे बुद्रुक येथे आकारास येत आहे. पुण्यातील ‘कलाकार कट्टा’ वाचावा यासाठी सुद्धा आम्ही लढा देत आहोत.

संस्थेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली आहे. ही माझ्यासाठी केवळ पद नाही, तर एक कर्तव्य आहे. मी ही जबाबदारी प्रामाणिकपणे, पारदर्शकपणे आणि सर्व व्यंगचित्रकारांना सोबत घेऊन पार पाडेन.

Previous Post

कु कूच कू

Next Post

दागिने कोणी चोरले?

Next Post
दागिने कोणी चोरले?

दागिने कोणी चोरले?

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.