• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

शिवसेनेने विविध पक्षांबरोबर २२ वेळा केली होती दोस्ती

सचिन परब by सचिन परब
December 10, 2020
in कारण राजकारण
0
शिवसेनेने विविध पक्षांबरोबर २२ वेळा केली होती दोस्ती

शिवसेनेची काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर असलेली युती म्हणजे काहीतरी नवीन आक्रीत असल्याची मांडणी होतेय. पण शिवसेनाप्रमुखांनी त्यांच्या हयातीतच काँग्रेस, समाजवादीच नाही तर मुस्लिम लीगबरोबरही राजकीय सोयरिक केल्याचा इतिहास आहे. भाजपसोबत असताना त्यांनी काँग्रेससोबत जाण्याचा रिवाज सोडला होता. आता भाजपची साथ सोडल्यामुळे स्वाभाविकपणे शिवसेना काँग्रेसकडे वळलीय.

शिवसेनेच्या स्थापनेपासून पहिल्या दोन दशकांचा काळ आजच्या पिढीला माहीत नाही. तेव्हा महाराष्ट्र काँग्रेस आणि मुंबई काँग्रेस यांच्यात वैमनस्य होतं. त्याचा फायदा बाळासाहेबांनी उचलला. त्यामुळेच वसंतराव नाईक ते वसंतदादा पाटील या काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांवर शिवसेनेला धार्जिणे असल्याचा आरोप सातत्याने होत राहिला.

विजय सामंत आणि हर्षल प्रधान यांनी लिहिलेल्या `सुवर्णमहोत्सवी शिवसेना` या पुस्तकात शिवसेनेच्या निवडणुकांतील यशापयशाची सविस्तर माहिती आहे. त्यातून हाही काळ उलगडतो. त्याच्या आधारे शिवसेनेच्या काँग्रेस आणि इतर सेक्युलर पक्षांतल्या जवळीकीचे हे एकदोन नमुने नाहीत, तर २२ घटना हाती लागतात. त्या अशा,

  1. शिवसेनेच्या स्थापनेनंतर एकाच वर्षात १९६७ला लोकसभा निवडणुका आल्या. त्यात कम्युनिस्ट आणि समाजवाद्यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या संपूर्ण महाराष्ट्र परिषदेने मुंबईत कॉ. श्रीपाद डांगे, आचार्य अत्रे, जॉर्ज फर्नांडिस, द.रा. गोखले आणि व्हीके कृष्णमेनन असे दिग्गज उभे केले होते.
    या पाच उमेदवारांना म्हणजे `पंचमहाभूतांना गाडा` असं आवाहन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मार्मिकमधून केलं. त्यासाठी कृष्णमेनन यांच्या विरोधातल्या काँग्रेसच्या स.गो. बर्वे आणि फर्नांडिस यांच्याविरोधात काँग्रेसच्याच स.का. पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला.
  2. याच निवडणुकीत आचार्य अत्रे यांचा पराभव झाला. त्यात शिवसेनेचं योगदान होतं. त्यांनी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष स.का. पाटील यांच्या नावावर शा‍ब्दिक कोटी करत शिवसेनेला `सदाशिवसेना` आणि मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या नावावरून `वसंतसेना’ अशी अत्रेस्टाईल नावं दिली होती. वसंतसेना हे प्राचीन संस्कृत नाटककार शूद्रकाने लिहिलेल्या मृच्छकटिक या नाटकातलं पात्रं आहे. पण काँग्रेसनेही त्याला उत्तर दिलं होतं. ते म्हणत, `शिवसेना हे संयुक्त महाराष्ट्र समितीचं अपत्य आहे. त्याचं नेतृत्व कम्युनिस्ट आणि समाजवाद्यांनीच केलं होतं.` संसदेतही कॉ. भूपेश गुप्ता आणि तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यातही नेमके हेच मुद्दे मांडत वाद झाल्याची नोंद आहे.
  3. शिवसेनेने मुंबई महानगरपालिकेची पहिली निवडणूक १९६८ साली लढवली. त्यात त्यांची युती राष्ट्रीय पक्षाचा दर्जा असलेला प्रजासमाजवादी पक्षाशी झाली होती. मधू दंडवते आणि ना.ग. गोरे हे त्या पक्षाचे नेते होते.
  4. शिवसेनेचे मुंबई महापालिकेतले पहिले महापौर डॉ. हेमचंद्र गुप्ते होते. दुरावलेल्या प्रजासमाजवादी पक्षाच्या उमेदवाराला पाडण्यासाठी शिवसेनेने काँग्रेसचा पाठिंबा घेतला.
  5. १९७३च्या मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेने रिपब्लिकन पक्षाच्या रा. सू. गवई गटाशी आघाडी केली होती. त्या युतीचं समर्थन करताना बाळासाहेब म्हणाले होते, `आमची रिपब्लिकनांशी युती व्हावी अशी माझी शिवसेनेच्या जन्मापासूनच इच्छा होती. ही केवळ दोन पक्षांची युती नाही. रिपब्लिकन हे सामाजिक दलित आहे तर आम्ही राजकीय दलित आहोत.’
  6. त्याचवर्षी शिवसेनेने सर्व विरोधी पक्षांना एकत्र करत सिंडिकेट काँग्रेसच्या मदतीने ३२ वर्षांच्या सुधीर जोशींना मुंबईचं महापौर बनवलं. त्यात शिवसेनेला मुस्लीम लीगच्या एका नगरसेवकाचाही पाठिंबा होता.
  7. जानेवारी १९७४मध्ये मुंबई लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेने काँग्रेसचे रामराव आदिक यांना उघड पाठिंबा दिला. त्यात आदिक पडले.
  8. इंदिरा गांधींनी १९७५ला आणीबाणी घोषित केली त्याच दिवशी बाळासाहेबांनी मार्मिकमधे `इंदिराजींचा मुजिबूर करू नका` असा अग्रलेख लिहून विरोधकांवर टीका केली होती. पुढे त्यांनी आणीबाणीचं शिस्तपर्व म्हणून समर्थन केलं. शिवसेनेवर बंदी घालण्याची मुंबई काँग्रेसमधल्या नेत्यांची मागणी इंदिरा गांधींनी धुडकावून लावली. पण मार्मिकवर बंदी घालण्यात आली होती. त्या मुंबईत आल्या तेव्हा शिवसेनेच्या महिला आघाडीने त्यांचं जोरदार स्वागत केलं.
  9. १९७६ला शिवसेनेने मुंबई महापौर निवडणुकीत जनता पक्षाच्या सोहनसिंह कोहलींनी पाठिंबा दिला होता. पण शेवटच्या क्षणी त्यांनी काँग्रेसच्या मुरली देवरांना मतदान करून महापौर बनवलं.
  10. १९७७च्या निवडणुकीत शिवसेनेने म्हणजे शिवसेनाप्रमुखांनी काँग्रेसचा प्रचार केला. तेव्हा आणीबाणी संपली होती. तरीही शिवसेना इंदिरा गांधींसोबत राहिली. त्यात काँग्रेस पराभूत झाली. तरीही काँग्रेस शिवसेना मैत्री अबाधित राहिली.
  11. १९७८सालच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने नामदेव ढसाळांच्या दलित पँथरला सोबत घेतलं होतं. तेव्हा शिवशक्ती-भीमशक्तीचा नारा गाजला होता.
  12. १९७९मधे तर शिवसेनेने थेट मुस्लिम लीगशी मैत्री केली. आज आश्चर्य वाटेल पण तेव्हा बाळासाहेब आणि मुस्लिम लीगचे नेते बनातवाला यांची एकत्रित सभा मस्तान तलाव इथे झाली होती. त्यामुळे भगवा आणि हिरवा एकत्र झळकला. शिवशक्ती, भीमशक्ती यांच्याबरोब मीमशक्तीही एकत्र आणण्याची घोषणा त्याच काळातली आहे.
  13. १९८०मधल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे दोन उमेदवार उभे होते. पण अधिकृत भूमिका म्हणून शिवसेनाप्रमुखांचं वाक्य होतं, इंदिराजींच्या हाताला साथ नि बाकीच्या पक्षांना हाणा सणसणीत लाथ!
  14. त्याचवर्षी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने इंदिरा काँग्रेसला समर्थन दिलं. त्यांचा प्रचार केला. एकही उमेदवार उभा केला नाही. बदल्यात काँग्रेसने शिवसेनेचे प्रमोद नवलकर आणि वामनराव महाडिक यांना विधानपरिषदेवर पाठवलं. याच निवडणुकीनंतर बाळासाहेबांचे मित्र अब्दुल रहमान अंतुले मुख्यमंत्री बनले. त्यामुळे ते सत्तेवर असेपर्यंत शिवसेना आणि काँग्रेसशी मैत्रीही शिखरावर होती.
  15. ९ सप्टेंबर १९८२ला शिवसेनाप्रमुखांनी मुंबईतल्या कामगार मैदानावर सभा घेऊन इंदिरा काँग्रेसशी असलेली ‘दोस्ती’ तोडल्याची घोषणा केली. त्याला दत्ता सामंत यांच्या गिरणी संपाची पार्श्वभूमी होती. पुढच्याच महिन्यात शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात तेव्हा समाजवादी काँग्रेसचे प्रमुख असलेले शरद पवार आणि लोकदलाचे जॉर्ज फर्नांडिस यांनी बाळासाहेबांच्या सोबतीने इंदिरा काँग्रेसला महाराष्ट्रातून घालवून देण्याच्या प्रतिज्ञा केल्या.
  16. २३ जानेवारी १९८४ला दादरमध्ये शिवसेनेचं पहिलं राज्यस्तरीय अधिवेशन भरलं त्यात ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कॉ. श्रीपाद डांगे आणि कॉ. एस.आर. कुलकर्णी प्रमुख वक्ते होते.
  17. १९८५च्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीआधी शिवसेना सतत पराभूत होत होती. तेवढ्यात मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी मुंबई काँग्रेसच्या पक्षांतर्गत प्रतिस्पर्ध्यांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभं करताना म्हटलं की मुंबई महाराष्ट्रापासून तोडून केंद्रशासित करण्याचं कारस्थान शिजतंय. त्याचा फायदा घेत शिवसेनेने अभूतपूर्व यश मिळवलं.
  18. हिंदुत्वाची भगवी शाल खांद्यावर घेतल्यानंतरही शिवसेनेने अधूनमधून काँग्रेसच्या काही भूमिकांचं कौतुक केलं. उदाहरणार्थ राजीव गांधींची गंगा स्वच्छता मोहीम. बाळासाहेबांनी काँग्रेसच्या अनेक नेत्यांशी असलेली मैत्री कधीही लपवली नाही.
  19. सुप्रिया सुळे २००६ला पहिल्यांदा राज्यसभेवर गेल्या तेव्हा शिवसेनेने त्यांना न मागता पाठिंबा दिला. त्यासाठी त्यांनी शरद पवारांच्या मैत्रीची साक्ष दिली.
  20. एनडीएचा प्रमुख घटकपक्ष असतानाही भाजपच्या विरोधाला न जुमानता २००७मधे शिवसेनेने काँग्रेसच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार प्रतिभा पाटील यांना समर्थन दिलं.
  21. प्रतिभा पाटील यांना समर्थन देताना शिवसेनेकडे निदान मराठीपणाचा मुद्दा तरी होता. पण त्यानंतर पाच वर्षांनी शिवसेनेने प्रणव मुखर्जींनाही राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून उघड पाठिंबा दिला. भाजपच्या भैरोसिंह शेखावत यांच्यापेक्षा प्रणवबाबू सर्वार्थाने उजवे उमेदवार आहेत आणि ते राष्ट्रपती बनले पाहिजेत, इतकी स्वच्छ भूमिका त्यामध्ये होती.
  22. २०११च्या डिसेंबरमध्ये रामदास आठवलेंबरोबर पुन्हा एकदा शिवशक्ती-भीमशक्तीचा प्रयोग करण्याचं आवाहन शिवसेनाप्रमुखांनी केलं होतं. त्यानुसार उद्धव ठाकरेंनी शिवशक्ती-भीमशक्तीचा प्रयोग घडवून आणला. तो २०१२च्या मुंबई महापालिका निवडणुकीत यशस्वीही ठरला.

१९८५च्या महाड अधिवेशनानंतर शिवसेनेने महाराष्ट्रभर पसरण्याचं धोरण आखलं. तिथे मराठी बाणा पुरेसा ठरणार नव्हता. त्यामुळे काळाची पावलं ओळखत शिवसेनेने हिंदुत्वाचा आधार घेतला. राज्यात काँग्रेसच प्रमुख स्पर्धक असल्याने काँग्रेसशी मैत्री कायमची संपत गेली.

काँग्रेसशी दोस्ती तुटण्याला दोन महत्त्वाच्या घटनांची पार्श्वभूमी होती. मुंबईतल्या गिरणी संपाच्या काळात शिवसेनेचं वर्चस्व संपवण्यासाठी काँग्रेस दत्ता सामंतांना वापरून घेत आहे, असं शिवसेनाप्रमुखांना वाटत होतं. शिवाय १९८४च्या भिवंडीताल हिंदू मुस्लिम दंगलीत जवळपास अडीचशे जणांचा बळी गेला. त्याचा केंद्रबिंदूही बाळासाहेबच होते. त्यात शिवसेना पहिल्यांदा प्रखर हिंदुत्वाच्या रस्त्यावर जाताना दिसली.

पुढच्या काळात बाळासाहेब आणि शरद पवार हे राज्याच्या राजकारणातले दोन ध्रुव बनले. ते एकमेकांच्या विरोधात लढत राहिले. भाजप सेनेच्या वळचणीला राहिलं. पण २०१४ला भाजप नावाचा तिसरा ध्रुव उभा राहिला. आणि २०१९च्या महाविकास आघाडीचा जन्म झाला!

Previous Post

शेतकऱ्यांची एकजूट; कृषी कायद्यांविरोधातील ‘बंद’ला राज्यासह देशभरात प्रचंड प्रतिसाद, केजरीवाल नजर कैदेत

Next Post

मालिकेत मोठ्या ज्योतिबाची एण्ट्री

Related Posts

कारण राजकारण

जातगणना : एक चुनावी जुमला!

May 15, 2025
कारण राजकारण

मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

May 15, 2025
कारण राजकारण

टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

May 15, 2025
कारण राजकारण

पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

May 8, 2025
Next Post
मालिकेत मोठ्या ज्योतिबाची एण्ट्री

मालिकेत मोठ्या ज्योतिबाची एण्ट्री

सखी गोखलेने जागवली बालपणीची आठवण

सखी गोखलेने जागवली बालपणीची आठवण

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.