• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

चला तिसरा एक दिवसीय तरी जिंकलो की नाही?

ag.bikkad by ag.bikkad
December 7, 2020
in फ्री हिट
0
चला तिसरा एक दिवसीय तरी जिंकलो की नाही?

– काय सांगतोस तिसरा शेवटचा एक दिवसीय सामना भारत जिंकला? कसे शक्य आहे? तुला आज कोणी भेटले नाही का वेड्यात काढायला?

– अरे नाही बाबा मी स्वतः डोळ्यांनी सोनीवर बघितलं – लाइव्ह .

– कुठले चॅनल बघितलस तु ?  हिंदी की इंग्लिश?

-अरे चमन त्याचा काही संबंध आहे का इथे ?

– अरे हो ते खरच म्हणा…

– पण मला सांग इतकया  भयानक फॉर्म मधले ऑस्ट्रेलियन साडे तीनशे, पावणे चारशेच्या खाली न ऐकणारा संघ कस काय हरला? दरवेळेस डेविड वॉर्नर व कर्णधार आरोन फिंच कमीत कमी शतकी भागीदारीची पायाभरणी करीतच होते ना?

– अरे दुसऱ्या मॅचमध्येच डेविड वॉर्नरने उगीच दोन चार धावांसाठी कारण नसताना वेड्यासारखा चेंडु झेप टाकुन अडवायचा प्रयत्न केला ना तो थोडासा अंगाशीच आला त्याच्या. आपले खेळाडुंच कसं मस्त साठ सत्तर  धावा झाल्या की ठरलेलं असतं, छान शॉवर वगैरे घेऊन, मस्त मालीश वगैरे झाल्यावर अगदीच कोणाचे फार पोट दुखायला नको म्हणुन थोडावेळ क्षेत्ररक्षणाला हजेरी लावायची. पण हे  ऑस्ट्रेलियन स्वतःला अगदी अतीच व्यावसायिक  खेळाडू समजतात आणि मग असं काहीतरी करुन स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतात. गेले ना त्याचेच  दोन आठवडे आता.

– आणि मग तो स्टीव स्मिथ, तिसरा येऊन क्रिज भर वाकडे तिकडे नाचत सर्वत्र फटक्यांची आतषबाजी करुन ६०/६५ चेंडूतच शतक फटकवून जात होता त्याचे काय ?

– अरे त्याची तर गंमतच झाली. तो आपल्या मुंबईच्या – म्हणजे खर्‍याखर्‍या हां, ते मुकेश भाऊ वा नीता वहिनींच्या मुंबई आयसारखा नाही – शार्दुल ठाकुरच्या लेगला जाणार्‍या निरुपद्रवी चेंडुवर यष्टीरक्षक राहुलकडे झेल देऊन फक्त ७ धावांवर चक्क बाद झाला की रे. माझा तर डोळ्यावर विश्वासच बसेना. अशक्य. केवळ मी बघितलं म्हणून सांगतोय, नाहीतर माझी तुझ्या सारखीच अवस्था झाली असती.

– काय रे पुढच्या वर्षी आयपीएलमध्ये येणार नाहीत असं तर नाही ना वाटलं त्याला. की, हे ते मॅच फिक्सिंग वगैरे असेल का रे ,पुढच्या सामन्यांचा गल्ला छान भरावा म्हणुन.

– ए अरे! हळु बोल उगीच कोणी ऐकले तर आपल्यालाही उच्च वा थेट सुप्रीम कोर्टात खेचुन दावा बिवा ठोकेल हं. मग ते आपले ही गॅलरीचे छत बीत पडणे, घराची झडती, और्थर रोड ते तळोजा, तो एक रु. च दंड वा बिनशर्त माफी वगैरे वगैरे.
नको रे बाबा तो विषय काढू परत असा जाहीरपणे.

आणि तुला एक सांगु का आपण अझरुद्दीन, अजय जाडेजा व मनोज प्रभाकर ह्यांना शिक्षा केली ना. तेव्हापासुन दशकांपर्वीच आपल्या पवित्र भारत भूमितील मॅच फिक्सिंग संपले. हां आता आयपीएलमध्ये थोडेफार चालत असेल कदाचित पण ते देखील अपवादाने नियम सिद्ध करण्यापुरतेच. आणि ते देखील आपण श्रीसंत वगैरेंना शिक्षा देऊन, चेन्नई , राजस्थान संघांना १/२ वर्षे निलंबीत करून  केव्हाच कायमचेच संपविले आहे ना. आणि इतकेही सोवळे राहायचे असेल तर मग आयपीएल तरी कशाला हवे ते? आता कसं सगळं स्वछ , स्वछ., निर्मळ,नितळ व न्यायमूर्ती लोढाना हवे होते त्तसे अगदी पारदर्शी वगैरे वगैरे.

– हो अरे मी तर ऐकले की आता सट्टासुद्धा अधिकृत होणार म्हणुन, अरे आपल्या नमोंच्या मंत्रीमंडळातीलच कोणी तरी म्हणाले म्हणे. मग काय मज्जा येईल ना .गल्लोगल्ली क्रिकेट कॅसिनोच कॅसिनो होतील नारे.

मग कित्ती कित्ती ते छोटे व्यावसायिक, आत्मनिर्भरतेच्या दिशेनी अजुन एक हनुमान उडी वगैरे वगैरे. मग त्याचा ही सोहळा, ती अजुनएक प्रेमळ एकतर्फी का होईना मन कि बात इत्यादि इत्यादि. रामराज्यच म्हणूया मग त्याला आपण २१व्या शतकातले.

– जाऊ दे रे आपण खेळाचा आनंद घेऊ या फक्त. कुठे तरी माणसातल्या चांगुलपणानावर श्रद्धा ही हवीच ना,सचिन, राहुल, कुंबळे वगैरे निवृत्त झाले म्हणुन काय सगळे निष्पाप खेळाडू संपले असे का समजायचे उगीचच. नव्या पिढीचा, नव्या स्वरुपातील आधुनिक हाय टेक निष्पापपणा वेगळा. आपणच आपल्या संघावर इतका अविश्वास दाखवून कस चालेल बर.

– अविश्वास नाही रे पण मला सांग आपण वर्षानुवर्षे काय बघत आलोय पाच सामन्यांची मालिका म्हणजे पहिल्या चार सामन्यात कायम दोन दोन बरोबरी. तीन सामन्यांची मालिका असेल तर पहिल्या दोन सामन्यात एकएक ची बरोबरी. पाकिस्तान असो वा इंग्लंड, वेस्टइंडीज वा अगदी ऑस्ट्रेलिया असं सगळं व्यवस्थित स्क्रिप्ट असतं ना नेहमी.म्हणजे आपल्यासारख्या सामान्य क्रिकेटरसिकांना पासून ते जाहिरातदार टीव्ही चॅनेल क्रिकेट बोर्ड आपले ब्रँडेड खेळाडू देखील अतिशय खुश असतात पण हे ऑस्ट्रेलियन कांगारू जरा जास्तच दिड शहाणे निघाले ,पहिल्या दोन सामन्यात त्यांनी मालिकेचा निकाल लावुन टाकला त्यामुळे तिसऱ्या सामन्यात त्यांच्या दृष्टीने केवळ नवोदितांना संधी देणे असल्याच गोष्टी बाकी होत्या ना.आपण आय सी सी कडे तक्रार केली तर ह्या आखिलाडू, अव्यवसायिक वर्तनाची?

– जाऊ दे रे,नको इतके मनावर घेऊस, ह्या महामारीत मनावर आधीच कमी ताण आहे का?

– हे बघ. त्यांनी पॅट कमिन्स व मिचेल स्टार्कला संघाबाहेर ठेवले ना. विश्रांती दिली.

– अरे पॅट कमिन्सचे एकवेळ ठीक. आपल्याला खुपच त्रास देत होता. पण मिचेल स्टार्कला उगीच बसवलं. मस्त अगदी पहिल्या षटकापासूनच तो वीसएक धावा द्यायचा.

– थांब रे जरा. आता थोडसं नीट शांतपणे सामन्याबद्दल ऐक बरं. आपण चक्क नाणेफेक वगैरे जिंकून पहिली फलंदाजी घेतली म्हणजे तेही कारण बाद झाले होते हरण्याचे. पण आपण कसले कपाळ करंटे इतकं सगळं व्यवस्थित असून आपण चक्क ऑस्ट्रेलियन स्पिनर समोर नांगी टाकली आणि ५ भाग १५२ अशी अवस्था करून घेतली. पण तेथून आता फक्त फलंदाज म्हणून खेळणाऱ्या हार्दिक ला स्वतःला सिद्ध करायला यापेक्षा चांगला चान्स मिळणार नव्हता व संजय मांजरेकर सारख्यांना कायमचे शांत बसवण्याचा इतका चांगला मोका जडेजाला कुठे मिळणार होता ना.सारखा सारखा अष्टपैलू न म्हणता बिट्स आणि पिसेस – तुकड्या तुकड्यांचा हं ( तुकडा तुकडा गॅंग नाही ते वेगळे प्रकरण ) म्हणत असतो कायम.

हार्दिक आणि जडेजा ह्या जोडीचे इरादे बुलंद होते. ३२ व्या षटकापासून शांतपणे डावाची उभारणी करत ४० व्या षटकनंतर फलंदाजीतील आक्रमणाची धार वाढवत शेवटच्या ५ षटकांत तर ह्या जोडीने अक्षरश: धुमाकुळ घातला व मुक्तपणे चौफेर चौकार,षटकारांची बरसात करत ७६  धावा लुटल्या. केवळ १०८ चेंडूत एकुण १५० धावांची अभेदय भागीदारी करून अगदी साडेतीनशे , पावणे चारशे नाही तरी बऱ्यापैकी ३०२ पर्यन्त मजल मारली व त्यायोगे  संपुर्ण भारतीय संघात विजयासाठी लढण्याची ईर्ष्या निर्माण केली. आणि विशेष म्हणजे बुमराह व शमी ला  गेल्या पाच सामन्यात जमलं नाही ते यावर्षीच्या आयपीएलमध्ये कौतुक झालेल्या पदार्पणवीर नटराजननी सहाव्या षटकातच सलामी जोडी फोडून दाखवली .नंतर तुला आधीच  सांगितल्याप्रमाणे स्मिथ आऊट झाला. तरी पण आपण आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे  उदारता सोडायला तयार नव्हतोच. ऑस्ट्रेलियाचा जावई शिखर धवनने 22 वर कर्णधार आरोन फिंचचा स्लिपमध्ये सोपा झेल सुद्धा टाकला. अजून एक सोपा धावबाद  करण्याचा प्रयत्न ही वाया घालवला.पण फिंच ने बाद व्हायचे प्रयत्न काही सोडले नव्हते व अखेर ७५ धावांवर २६ व्या षटकात १२३/४ वर तंबुत परतला. मग यष्टीरक्षक डावखुर्‍या अलेक्स कॅरी चा प्रतिकार सोडल्यास, ग्लेन मॅक्सवेलचा च मोठा अडथळा होता. ३८ व्या षटकात ३०३ धावांचा पाठलाग करताना दबावाखाली येऊन कॅरी अखेर धावबाद झालाच. २१०/६. मॅड मॅक्स ग्लेन मॅक्सवेल नी नेहमीप्रमाणे स्पिनर जाडेजा व कुलदीप ला स्टेडीयम छतावरून बाहेर भिरकावत सामन्याची सुत्रे पुर्णपणे हातात घेतली, तेव्हा ३-० चा व्हाईट वॉश निश्चित वाटत होता. पण केवळ ३८ चेंडूत ४ षटकारांसह ५९ वर पोहचलेल्या ,नंतर कांगारू विजयासाठी  ३४ चेंडूत ३५ धावा इतके सोपे समीकरण असतानाही अति महत्वाकांक्षे मुळे म्हणा की ज्यादा आत्मविश्वास नडल्यामुळे असेल, बुमराहच्या भेदक यॉर्कर ला कव्हर वरुन टोलावण्याचा प्रकार नडुन मॅक्सवेल ला त्रिफळाचीत व्हावे लागले. अलीकडे बळींचा दुष्काळ जाणवत असुनही जसप्रीत बुमराहने धिराने शांतपणे केलेल्या उत्कृष्ट गोलंदाजीलाही ह्याचे श्रेय द्यावेच लागेल.

तर मी काय म्हणतो, हे सगळे असे असुनदेखील मालिका पराभवानंतर, उशिरा का होईना झगडुन मिळवलेल्या १३ धावांच्या विजयाचे महत्व अजिबात कमी होत नाहीये. ह्या विजयाचे प्रमुख शिल्पकार अर्थातच हार्दिक पंड्या व रविंद्र जाडेजा .तसेच दौर्‍यावर प्रथमच संधी मिळालेले आक्रमक द्रुतगती गोलंदाज शार्दुल ठाकुर, नवोदित पदार्पणवीर नटराजन. जसप्रीत बुमराह व अर्थातच गोलंदाजांना – मागच्या सामन्यातील अगदीच २-२ षटकांचे हफ्ते देणे अशासारख्या चुका टाळून – व्यवस्थित हाताळणारा कर्णधार विराट कोहली. बाकी विराट कडून कमीतकमी अर्धशतक तर आपण गृहितच  धरलेले असते ना. ह्यावेळेस ६३.  त्यामुळे  एकदिवशीय सामन्यांच्या लागोपाठ पाच पराभवांमुळे अगदीच गमवलेली भारतीय संघाची  थोडीफार प्रतिष्ठा परत मिळवत उर्वरित दौर्‍यासाठी  मनोबळ उंचवलेलेच राहील हे बघितले. उर्वरित तीन टीट्वेंटी व चार कसोटी सामन्यांसाठी भारतीय क्रिकेट रसिकांच्या अपेक्षा वाढविल्या हे मात्र नक्की.

-खरय ज्याचा शेवट गोड ते सारेच गोड. आपण पडलो परंपरावादी .ऑस्ट्रेलियन खेळपट्ट्यांवर अजून एक मालिका पराभूत होण्याची परंपरा कायम राखली ना आपण. असो सध्यातरी झाले गेले गंगेला मिळाले टी-20 लॉटरी लागते का बघू या नाहीतर नंतरच्या टेस्ट मॅचेस आहेतच, पुजारा राहणे टिकले तर तिथे आशा आहेच ना.

– चल तर मग आता शांतपणे मोकळ्या मनाने परत उर्वरित मालिकेचा आनंद लुटुया.

Tags: cricketCricket AustraliaIndian Cricket Team
Previous Post

करोनावासातील नर्मविनोद

Next Post

व्हेल माशाच्या उलटीने मच्छिमार करोडपती

Related Posts

फ्री हिट

संधीचा चेंडू त्यांच्या दिशेने वळलाच नाही…

March 16, 2025
फ्री हिट

मिश्कील, उमदा, खेळकर सुनील!

July 19, 2024
फ्री हिट

त्यांचं काय चुकलं?

May 10, 2024
फ्री हिट

‘ते’ सध्या काय करतायत?

February 16, 2024
Next Post
व्हेल माशाच्या उलटीने मच्छिमार करोडपती

व्हेल माशाच्या उलटीने मच्छिमार करोडपती

8 डिसेंबरचा ‘हिंदुस्थान बंद’ यशस्वी करून झोपी गेलेल्या केंद्र सरकारला जागे करा – अशोक चव्हाण

8 डिसेंबरचा ‘हिंदुस्थान बंद’ यशस्वी करून झोपी गेलेल्या केंद्र सरकारला जागे करा – अशोक चव्हाण

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.